Kapil Sharma: कपिल शर्माच्या डेब्यू चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट होणार डबल धमाका

Kapil Sharma: विनोदी कलाकार कपिल शर्माच्या २०१५ मधील रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'किस किस को प्यार करूं' च्या सिक्वेलचे शूटिंग सुरू झाले आहे. यावेळी मनजोत सिंग देखील चित्रपटात दिसणार आहे.
Kapil sharma Kis Kisko Pyaar Karoon 2
Kapil sharma Kis Kisko Pyaar Karoon 2 Saam Tv
Published On

Kapil Sharma: लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्माच्या २०१५ मधील रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'किस किस को प्यार करूं'च्या सिक्वेलची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कपिल शर्माच्या डेब्यू चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला कपिलचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा कपिल शर्मा चाहत्यांना हसवण्यासाठी येत आहे.

'किस किस को प्यार करूं २' चे चित्रीकरण सुरू

प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माने 'किस किस को प्यार करूं' या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आता या चित्रपटाच्या 'किस किस को प्यार करूं २' या सिक्वेलबद्दल एक अपडेट आली आहे की या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

Kapil sharma Kis Kisko Pyaar Karoon 2
Akshay Kumar: बॉलिवूडमध्ये 'हा' मोठा बदल घडवून आणणं गरजेचं; त्या मुद्द्यावर स्पष्टचं बोलला अक्षय कुमार

मनजोत सिंग कलाकार

कपिल शर्माचा 'किस किस को प्यार करूं २' हा चित्रपट अनुकल्प गोस्वामी दिग्दर्शित करत आहेत. तर, रतन जैन आणि गणेश जैन यांच्या व्हीनस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंट अंतर्गत अब्बास मस्तान फिल्म प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचसोबत मनजोत सिंग या चित्रपटात विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे.

Kapil sharma Kis Kisko Pyaar Karoon 2
Shahrukh Khan: शाहरुख खानला मिळणार महाराष्ट्र सरकारकडून कोट्यवधी; कारण ऐकून व्हाल थक्क

कपिल शर्मा वोर्कफ्रण्ट

कपिल शर्मा शेवटचा २०२४ मध्ये आलेल्या 'क्रू' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तब्बू, कृती सेनन आणि करीना कपूर सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर क्रूमध्ये कपिलने तब्बूच्या पतीची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com