जय भानुशाली आणि माही विजचा घटस्फोट झाला आहे.
घटस्फोटनंतर माही विजचे नाव तिचा मित्र नदीमसोबत जोडले जात आहे.
माहीने सोशल मीडियावर पोस्ट करून ट्रोल करणार्यांना चांगलेच सुनावले.
टिव्ही अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांचा घटस्फोट झाला आहे. दोघे अनेक काळापासून चांगलेच चर्चेत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर शनिवारी माही विजने तिचा जिवलग मित्र नदीमच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली. ज्यात ती त्यांना केक भरवताना दिसत आहे. शुभेच्छांमधून तिने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या पोस्टचा नेटकऱ्यांनी वेगवेगळा अर्थ लावला. ज्यामुळे माही विजला ट्रोल करण्यात आले.
माही विजच्या नदीमसोबतच्या पोस्टमुळे तिचे नाव नदीमसोबत जोडण्यात आले. ज्यामुळे माही विज, जय भानुशाली आणि अनेक कलाकार चिडले. अभिनेत्री अंकिता लोखंडेने यासंबंधित एक संतप्त पोस्ट देखील लिहिलं. तिने पोस्टमधून स्पष्ट केले की, नदीम हा माही आणि जयच्या वडिलांसारखा आहे. तसेच त्यांची मुल त्याला वडीलांप्रमाणे मानतात. अंकिताची पोस्ट जय भानुशालीने रिपोस्ट केली आणि त्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्याने लिहिलं की, "धन्यवाद अंकिता, आणि मी तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे..."
आता माही विजने देखील या गोष्टीवर मौन सोडले आहे. तिने एक पोस्ट करून तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. व्हिडिओमध्ये माही म्हणते, जय आणि मी शांतते आणि एकमेकांचा आदर करत घटस्फोट घेतला हे तुम्हा लोकांना पचले नाही. तुम्हाला वाद हवा आहे, तुम्हाला लोक घाण हवी आहे. नदीम, माझा सर्वात चांगला मित्र आहे. मी सहा वर्षांपासून त्याच्यासोबत पोस्ट टाकत आहे. तारा सहा वर्षांपासून त्याला अब्बा म्हणत आहे. हा निर्णय तिच्या आणि जय भानुशाली यांच्या संयुक्त होता. तुम्ही लोकांनी 'अब्बा' हा शब्द इतका घाणेरडा बनवला आहे. तुम्हाला कर्माची भीती नाही. तुम्ही लोक कोणत्याही थराला जाऊ शकता. तुम्हाला लाज वाटते, मी तुमच्यावर थुंकतो."
व्हिडिओमध्ये माही पुढे म्हणाली, "माझ्याबद्दल आणि नदीमबद्दल इतके मूर्खपणा लिहिल्याबद्दल मी तुमच्यावर थुंकते. जो माझ्या आयुष्यात फक्त गॉडफादरच नाही तर इतक्या लोकांसाठी आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना 'आय लव्ह यू' म्हणत नाही का? कमेंट्स करणारे अर्धे बनावट फॉलोअर्स आहेत. मला माहित नाही की हे सर्व कोण करत आहे. हे बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला हे करू देणार नाही. तुम्ही लोक कचरा आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे."
व्हिडिओच्या शेवटी माही बोललीस, "तुम्हाला माहित नसेल की सर्वोत्तम मित्र काय आहे, तर नरकात जा आणि नरक तुमच्यासाठी दूर नाही कारण तुम्ही एका महिलेबद्दल बकवास बोलत आहात. काहीही न जाता. काहीही लिहित आहात. मी स्वतःसाठी उभी राहीन..." हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.