Sakshi Sunil Jadhav
हाय कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लाक तयार होतो आणि हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
तुम्हाला हे प्रमाण घरच्याघरी कमी करायचे असेल तर, आहारात काही खास पदार्थांचा समावेश करणं खूप फायदेशीर ठरेल. खाली अशाच 4 प्रभावी गोष्टींची माहिती दिली आहे.
ओट्स, डाळिंब, सफरचंद, संत्र्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्या पदार्थांने तुम्हाला घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करता येईल.
ओट्स आणि इतर फळांमधले फायबर्स हे खराह बांधून शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं.
रोजच्या नाश्त्यात ओट्सचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या कमी होतो आणि तुम्ही हेल्दी राहता. omega-3 foods
अखरोडमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून धमन्या मऊ ठेवतं.
दररोज एक मूठ अखरोट खाल्यास कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. फॅटी फिश सॅल्मन, टूना सुद्धा ओमेगा-3 ने समृद्ध असून हृदयाचे संरक्षण करतो.
लसूणामध्ये असलेल्या अॅलिसीनमुळे LDL कमी होतं, रक्त पातळ राहतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. तुम्ही सकाळी मध आणि लसणाचे सेवन करणे योग्य ठरेल.
मूग डाळेतील फाइबर आणि पॉलीफेनॉल्स कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करतात आणि धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊ देत नाहीत. त्यामुळे हृदय निरोगी राहतं.