Nidhi Bhanushali: 'तारक मेहता का...' फेम निधी भानुशाली दिसणार नव्या वेबसीरिजमध्ये, साकारणार अनोखी भूमिका

Nidhi Bhanushali Sisterhood: अभिनेत्री निधी भानुशाली एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडिया हँडलवर निधी भानूशालीने एक पोस्ट शेअर केली आहे.
Nidhi Bhanushali
Nidhi BhanushaliSaam Tv

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेली २० वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.मालिकेतील कलाकारांना या शोमुळे ओळख मिळाली. मालिकेतील अनेक पात्रांनी शो सोडला असला तरी त्यांची प्रसिद्धी आज त्याच नावाने आहे. मालिकेत सर्वांचीच लाडकी सोनू म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री निधी भानुशाली एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nidhi Bhanushali
Kartik Aaryan Fees : कार्तिक आर्यन फीसमध्ये मोठी घट करण्याच्या तयारीत, नेमकं कारण काय ?

सोशल मीडिया हँडलवर निधी भानूशालीने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री एका नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर शेअर करत निधीने "शाळेच्या दिवसातील आठवणी आणि मैत्री घट्ट करण्यासाठी घेऊन आलीय गर्ल गँगँ" असं कॅप्शन दिलं आहे. "निधी गर्ल गँग" या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती एका शाळेतल्या मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nidhi Bhanushali
Munjya Box Office Collection : पाचव्या दिवशीही 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर जोमात, कोकणातल्या लोककथेची देशभरामध्ये चर्चा

निधी भानुशालीने वयाच्या १३ व्या वर्षी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत एन्ट्री केली होती. बालकलाकार म्हणून मालिकेत निधीला सोनूची भूमिका मिळाली. २०१२ ते २०१७ निधीने या मालिकेत काम केले. यानंतर वैयक्तिक कारणांमुळे निधीने ही मालिका सोडली. आता निधी वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निधीची गर्ल गँग ही सीरिज १३ जूनपासून Amazon Mini वर प्रसारित होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com