Kiran Bedi Biopic : देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा बायोपिक येणार, नाव ठरलं, प्रोमो रिलीज

Kiran Bedi Biopic Announcement : किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. या पहिल्या महिला आयपीएस अधिकारीचा बायोपिक प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.
Kiran Bedi News
Kiran Bedi Biopic Announcement Saam Tv
Published On

किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीतील पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. याच पहिल्या महिला आयपीएस अधिकारीचा बायोपिक प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे . महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकचं नाव 'बेदी' असं आहे. या बायोपिकचा पहिला प्रोमो निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असून हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

Kiran Bedi News
Kangana Ranaut : "भारतीयांनी आळशी होऊ नये, कारण...", वर्क कल्चर आणि विकेंडबद्दल कंगना रणौत यांचं भाष्य

निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी त्यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. जबरदस्त म्युझिकसह मोशन देत हा निर्मात्यांनी प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशल चावला करीत असून चित्रपटाची निर्मिती ड्रीम स्लेट पिक्चरच्या बॅनरखाली गौरव चावला करी आहे.

अद्याप तरीही दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केलेली नाही. किरण बेदी यांचा बायोपिक बॉक्स ऑफिसवर २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. किरण बेदी या देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आयएएस ऑफिसर्सपैकी एक आहेत. त्या उत्तम टेनिसपटूही होत्या. किरण बेदी १९७२च्या बॅचमधील देशाच्या पहिल्या महिला आयपीएस ऑफिसर होत्या. ३५ वर्षे देशाची सेवा केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. त्यावेळी किरण बेदी ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदावर कार्यरत होत्या.

Kiran Bedi News
Munjya Box Office Collection : पाचव्या दिवशीही 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर जोमात, कोकणातल्या लोककथेची देशभरामध्ये चर्चा

किरण बेदी यांनी दिल्ली, गोवा, चंदीगड आणि मिझोरामसह अनेक ठिकाणी आयपीएस अधिकारी म्हणून काम केलं आहे. अमृतसरमध्ये ९ जून १९४९ रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी ड्रग्ज विरोधात अभियान चालवलं होतं. त्यांनी तुरुंगात कैद्यांच्या धूम्रपानावर बंदी घातली होती. किरण बेदी यांनी इतरही अनेक सामाजिक कामं केली आहेत. किरण बेदी आणि बृज बेदी यांची दोघांचीही टेनिस कोर्टमध्ये ओळख झाली होती. ९ वर्षे मोठे असलेल्या बृज बेदी यांनी १९७२ मध्ये लग्न केले.

Kiran Bedi News
Sonakshi Sinha About Marriage : दबंग गर्ल आणि झहीरच्या लग्नावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चा, सोनाक्षी सिन्हाने एका वाक्यात उत्तर दिलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com