Golden Temple Blast: अमृतसर पुन्हा हादरले! सुवर्ण मंदिराजवळ तिसरा स्फोट; पोलिसांनी 5 जणांना केली अटक

Punjab News: अमृतसरमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन स्फोटांच्या घटना घडल्या आहेत.
Amritsar Blast
Amritsar BlastANI
Published On

Amritsar Blast: पंजाबमधील अमृतसर पुन्हा स्फोटाने (Amritsar Blast) हादरले आहे. सुवर्ण मंदिर (Golden Temple) परिसरात गुरुवारी तिसऱ्यांदा स्फोट करण्यात आला आहे. या मंदिर परिसरात पाच दिवसांत तीन स्फोट करण्यात आले आहे. अमृतसरमध्ये स्फोटाची मालिका सुरुच आहे. या स्फोटानंतर पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी मंदिर परिसर चारही बाजूने सील केला. या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी (Punjab Police) 5 जणांना अटक केली आहे.

Amritsar Blast
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ! DA बाबत आली मोठी बातमी; महागाई भत्ता 46...

मिळालेल्या माहितीनुसार, गुरु नगरी अमृतसरमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन स्फोटांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (SGPC) सेवेदारांनी या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. स्फोट केल्यानंतर आरोपी झोपले होते. संशय आल्यानंतर सेवेदारांनी या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Amritsar Blast
Crime News: दोन बहिणी एक वर्ष घरात कोंडून राहिल्या; दरवाजा उघडताच पोलिसांनाही बसला धक्का

एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी सांगितले की, एसजीपीसीच्या पथकाने स्फोटाचा त्वरित तपास केला आणि आरोपींना अटक केली. स्फोटानंतर काही तासांतच सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना शोधून काढले. एसजीपीसी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे हरजिंदर सिंग धामी यांनी कौतुक केले. आमच्या कर्मचाऱ्यांनी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता एक व्यक्ती शौचालयात शिरताना आणि एक बाहेर जाताना दिसली. त्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना अटक केली.

Amritsar Blast
Mumbai Crime News: नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा गंडा; मालवणी पोलिसांकडून ५ जणांना अटक

धामी यांनी पुढे सांगितले की, मुख्य आरोपीने सुवर्ण मंदिराजवळील एका सरायच्या दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून बॉम्ब फेकला. त्यानंतर तो परत रुम नंबर 225 मध्ये आला आणि बाहेर झोपला. ते म्हणाले की, रात्री यात्रेकरू धर्मशाळेच्या व्हरांड्यात आणि मोकळ्या जागेत झोपतात. आरोपी ज्या खोलीच्या बाहेर झोपले होते त्या खोलीत गुन्ह्यात सहभागी असलेले नवविवाहित जोडपेही झोपले होते. पहाटे 4 वाजता आरोपीला अटक करण्यात आली. सुवर्ण मंदिराजवळ हा तिसरा कमी तीव्रतेचा स्फोट होता. पहिला स्फोट 6 मे रोजी हेरिटेज स्ट्रीटवर आणि दुसरा 8 मे रोजी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com