Crime News: दोन बहिणी एक वर्ष घरात कोंडून राहिल्या; दरवाजा उघडताच पोलिसांनाही बसला धक्का

Two Sisters Locked In Home: एक वर्षांपासून घराबाहेर न पडल्याने त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता.
Crime News
Crime NewsSaam TV

Haryana Two sisters: हरियाणामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन बहिणींनी गेल्या एक वर्षापासून स्वत:ला घरामध्ये कोंडून घेतलं आहे. शेजारच्या व्यक्तींना या दोघींमध्ये चिंताजनक बदल जाणवू लागल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दोघींनाही पोलिसांनी रेस्क्यू केलं आहे.(Latest Marathi News)

विवस्त्र पडली होती तरुणी

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. १ वर्षापासून घरात बंद असलेल्या या मुलींचे मानसिक संतूलन बिघडले आहे. पोलिसांनी त्यांना रेस्कू करण्यासाठी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण घरात एक मुलगी विवस्त्र होती, तर दुसरीची मानसिक स्थिती देखील चींताजनक होती.

Crime News
Political Crisis: काय झाडी, काय डोंगर वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ...; राऊतांना म्हणायचंय तरी काय?

मुलींनी स्वत:ला कोंडून का घेतलं?

पोलिसांना शेजारील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या दोन्ही मुलींच्या आई बाबांचे निधन झाले. दोघी देखील उच्चशिक्षित आहेत. त्यांनी एमए पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. आई बाबांच्या निधनानंतर त्या दोघी खूप घाबरल्या. इतर नातेवाईक आपल्याला फसवून घर हडपतील असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे या मुलींनी घरामध्येच स्वत:ला कैद करून घेतलं.

खिडकीने घेत होत्या आवश्यक वस्तू

घरामध्ये (Home) राहत असताना या मुलींना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू मिळवण्यासाठी देखील दरवाजा उघडला नाही. शेजारच्या व्यक्तींकडून या मुली खाण्यापिण्याच्या वस्तू घेत होत्या. एक वर्षांपासून घराबाहेर न पडल्याने त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. या कचऱ्यामुळे घरात मोठी दुर्गंधी पसरली होती.

Crime News
Maharashtra Political Crisis: तब्बल १० महिन्यांनंतर होणार फैसला! जाणून घ्या महाखटल्याच्या सुनावणीमधील महत्वाच्या ५ गोष्टी

पोलीस जेव्हा या मुलींना रेस्क्यू करण्यासाठी घरी गेले तेव्हा दोघीही दरवाजा उघडण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांना २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर घराच्या छतावरून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या मुलींना सुरक्षीत घरातून बाहेर काढण्यात आले आहे. सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com