Political Crisis: काय झाडी, काय डोंगर वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ...; राऊतांना म्हणायचंय तरी काय?

Maharashtra Political Crisis: खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं आहे. राऊतांच हे ट्वीट चांगलच चर्चेत आलं आहे.
Narhari Zirwal On Maharashtra Political Crisis
Narhari Zirwal On Maharashtra Political CrisisSaam Tv
Published On

Sanjay Raut: आज सत्ता संघषर्घाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे वेधलं आहे. अशात खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं आहे. राऊतांच हे ट्वीट चांगलच चर्चेत आलं आहे. यात त्यांनी विधानसभा उपाअध्यक्ष नरहरी झिरवळ हे शिंदे गटाच्या नेत्यांची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. (Political Crisis)

संजय राऊतांच ट्वीट

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, ... आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. मात्र आज सकाळपासूनच झिरवळ नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

Narhari Zirwal On Maharashtra Political Crisis
Shiv Sena Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच ठरलं; ठाकरे गटाचं पोस्टर VIRAL

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला किंवा विधानसभा अध्यक्षांकडे तो निर्णय आला तर काय होणार याबाबात राज्यासह देशातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. यावर विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, त्यावेळी मी जो निर्णय दिला, तो कुठल्या राजकीय हेतूने दिलेला नाही. कारण विधासभा हे एक सार्वभौम सभागृह आहे आणि ते घटनेनुसार चालते, धोरणावर आणि नियमांनुसार चालंत. त्यापद्धतीने मी योग्य तो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की न्यायदेवाता माझ्या निर्णयाचा नक्कीच विचार करेल की मी दिलेला निर्णय योग्य आहे, असे झिरवळ म्हणाले.

Narhari Zirwal On Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा फैसला आजच! ठाकरे-शिंदे गटाची धडधड वाढली; या आहेत निकालाच्या शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com