Manasvi Choudhary
आजकाल केस गळण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही घरगुती सोपे उपाय करू शकता.
कांदा हा केसांसाठी गुणकारी मानला जातो. कांद्याचा रस करून तुम्ही केसांना लावल्यास केसांची वाढ होते.
कांद्याचा रस बनवण्यासाठी कांदा बारीक चिरून तो मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर कांद्याची बारीक पेस्ट एका सुती कापड्यामध्ये गाळून एका पेल्यामध्ये काढा.
कांद्याच्या रसमध्ये तुम्ही रोजमेरीचे पाने किंवा रोजमेरीचे तेल देखील मिक्स करू शकता.
आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे तेल तुम्ही केसांना लावून त्याची मालिश करा म्हणजे तुम्हाला फरक दिसेल.
केसांना कांदा लावून मालिश केल्याने केस दाट होतात व केस गळणे कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.