Sahil Khan Mahadev Betting App Case Instagram
मनोरंजन बातम्या

Sahil Khan held in Mahadev betting app case : अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई

Mahadev Betting App Case : अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शनिवारी मुंबई उच्च न्यायालायाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

Chetan Bodke

Mahadev Betting App Case

महादेव बुक ऑनलाईन बॅटिंग ॲप प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शनिवारी मुंबई उच्च न्यायालायाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

(Mumbai Police Taken Actor Sahil Khan Into Custody From Chhattisgarh)

साहिल खानला पोलिसांनी छत्तीसगढमधून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याला आज (रविवारी- २८ एप्रिल) त्याला मुंबईत आणलं जाणार आहे. ऑनलाइन बेटिंग ॲप्लिकेशनचे प्रमोशन केल्याचा साहिल खानवर आरोप आहे. या प्रकरणात त्याची चौकशी सुद्धा झाली होती.

त्याला लवकरच अटक होणार, अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. शनिवारी साहिल खानने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी छत्तीसगड येथून त्याला ताब्यात घेतलं आहे.

१५ हजार कोटींच्या महादेव बुक ऑनलाईन बॅटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आजच त्याला कोर्टामध्ये दाखल केले जाणार आहे. त्यानंतर त्याची पोलिस कोठडी घेतली जाईल. साहिल खानच्या अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. त्याने अनेक राज्यांमध्ये प्रवास केला होता. त्यानंतर तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याच्या मागावर होते. साहिल खानला छत्तीसगड येथील जगदलबपूर येथून आज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने अभिनेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटल्यानंतर साहिल खानच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तेव्हापासून पोलिस साहिल खानच्या तपासात होते.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने साहिल खानचा जबाब नोंदवला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचे व्यापक स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. सध्याच्या प्रकरणाची संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरण्यात आली आहेत, त्यामुळे खानविरुद्ध उपलब्ध साहित्य पाहता आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही, असे कोर्टाने सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Accident : पिकनिकला निघालेली शाळेची बस उलटली; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरातील दुर्दैवी घटना

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Madhur Bhandarkar: 'सुपरस्टारची पत्नी होणे सोपे नाही....' ; पाहा मधुर भांडारकरचा आगामी चित्रपट

New Marathi Movie: सोनाली कुलकर्णी आणि स्वप्निल जोशीची केमेस्ट्री; "सुशीला - सुजित" मध्ये नेमकं काय असणार?

IPL 2025: Vaibhav Suryavanshi खरंच १३ वर्षांचा आहे का? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT