FIR File Against Actor : साहिल खान पुन्हा अडचणीत; अभिनेत्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल

Sahil Khan In Trouble: अंबोली पोलिसांनी साहिल खानसह आणखी सहा जणांवर सायबर गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
FIR File Against Actor Sahil KHan
FIR File Against Actor Sahil KHanSaam TV

FIR File On Sahil Khan : बॉलिवूड अभिनेता साहिल खान पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. त्याच्यावर अंधेरीतील पोलीस स्थानकाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबोली पोलिसांनी साहिल खानसह आणखी सहा जणांवर सायबर गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.

आंबोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने अभिनेता साहिल खान विरोधात सोशल मीडियावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Entertainment News)

FIR File Against Actor Sahil KHan
Ranbir Kapoor's Animal Pre-Teaser Out : ॲनिमल प्री-टीजर प्रदर्शित: रणबीरचा थरार पाहून अंगावर येईल काटा

पोलिसांनी सांगितले की, आम्हाला मिळालेल्या तक्रारीनुसार विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मनीष गांधी असे तक्रारदाराचे नाव असून तो इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो.

मनीष गांधी एका कंपनीचे मालक आहे. त्यांनी साहिलसोबत काम करण्यास नकार दिला. त्यामुळे साहिलनं गांधी आणि त्यांच्या कुटूंबियांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे.

१२ मार्च रोजी गांधी यांच्या एका मित्रानं त्यांच्या कुटूंबियांची सोशल मीडियावर बदनामी होत असल्याचे त्यांना सांगितले. यामध्ये मनीष गांधी आणि कुटुंबियांचे काही फोटो मॉर्फ करण्यात आले होते. (Actor)

इन्स्टाग्रामवर गांधी यांचे काही फोटो मॉर्फ करून वापरण्यात आले होते. त्या फोटोखाली अनेक कमेंट होत्या. ज्या खूप अश्लील आणि विकृत असल्याचे गांधी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

गांधी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन साहिलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर गांधी यांनी इन्स्टाग्रामला त्यांचे अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com