Fake Sim Card : राज्यात ७५ ठिकाणी बनावट सिमकार्ड विक्री; नगरमध्‍ये दोन जण ताब्यात

राज्यात ७५ ठिकाणी बनावट सिमकार्ड विक्री; नगरमध्‍ये दोन जण ताब्यात
Fake Sim Card
Fake Sim CardSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : बनावट आधार कार्डच्या माध्यमातून राज्यात हजारो सिम कार्ड विकणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सर्व पोलीस (Police) अधीक्षकांना तसे पत्र दिले असून अहमदनगर (Ahmednagar) येथे दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेतले असून १८० सिम कार्ड जप्त केले आहेत. (Live Marathi News)

Fake Sim Card
Pune Crime News : आई-वडिलांना जीवे मारायची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटनेने संताप

राज्यातील ७५ सिम कार्ड विक्रेत्यांकडून आधार कार्ड आणि फोटोचा गैरवापर करत एकाच नावाने अनेक सिम कार्ड नोंदवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या विक्रेत्यांनी हजारो सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केले आहेत. अहमदनगर शहरातील तागडवस्ती येथून एका सिम कार्ड विक्रेत्याला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १०८ सिम कार्ड जप्त केले आहेत. तर पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील एका सिम कार्ड विक्रेत्याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या त्याच्याकडून ७२ सिम कार्ड जप्त केले आहेत.

Fake Sim Card
Dhule News : विषारी साप खुुराड्यात घुसला, कोंबडीची ७ अंडी गिळली; सर्पमित्रानं मोठ्या हिंमतीनं वाचवलं

मोबाईल टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कंपनीचे सिम कार्ड जास्तीत जास्त विक्री व्हावी. यासाठी विक्रेत्यांना अनेक प्रलोभने दिली यातून विक्रेत्यांनी ग्राहकांकडून मिळालेला आधार कार्ड आणि फोटोंचा गैरवापर करत एकाच्याच नावे अनेक सिम कार्ड विक्री केल्याचं दाखवत कंपन्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार केवळ कंपन्यांच्या फसवणुकीपुरता राहिला आहे, की यातून अन्यही काही गैरप्रकार केले गेले आहेत याबाबतचा तपास आता पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com