Swiggy-Zomato: मुंबईत स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प

Swiggy and Zomato Services Disrupted: इराण-इस्राइल युद्धामुळे मुंबई गॅसवर आली आहे. गॅस तुटवड्यामुळे मुंबईमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट्सने स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद केली आहे.
Swiggy and Zomato Services Disrupted
Swiggy-ZomatoSaam Tv
Published On

Summary:

  • मुंबईमध्ये स्विगी- झोमॅटो ऑर्डर बंद

  • गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील हॉटेल्स अडचणीत

  • मुंबई रेस्टॉरंट्सने ऑनलाइन ऑर्डर स्वीकारणे बंद केले

  • महाराष्ट्रात गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम

Swiggy-Zomato Order: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या तुटवड्याचा फटका मुंबईतील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. अनेक हॉटेल चालकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून येणाऱ्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणे तात्पुरते बंद केले आहे. गॅसचा पुरवठा अनिश्चित झाल्याने हा निर्णय घेतल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हॉटेल चालकांसह अनेक कर्मचाऱ्यांवरही आर्थिक संकट ओढावण्याची वेळ आली आहे.

गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे मुंबई, पुण्यासह काही प्रमुख शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आली आहे. मर्यादित इंधन पुरवठ्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना आपले मेनू आयटम कमी करावे लागले आहेत. ज्याठिकाणी खाद्यपदार्थाचे ५० पर्याय असायचे ते आता १० ते २० वर आणण्यात आले आहेत.

मेनू कार्ड आणि ऑनलाइन अॅप्सवर दिसणारे फूड्सचे पर्याय देखील कमी करण्यात आले आहेत. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर हॉटेल आणि रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थांचे दर देखील वाढतील आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

Swiggy and Zomato Services Disrupted
LPG Gas Rules : इस्रायल-इराण युद्धाची झळ स्वयंपाक घराला, एलपीजी सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल

फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्ससह अनेक उद्योगांना गॅस टंचाईचा फटका बसत आहे. गॅस पुरवठ्याच्या अभावामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल्स सध्या बंद आहेत. जर गॅस सिलिंडरचा प्रश्न सुटला नाही तर येत्या २ दिवसांत मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात, अशी माहिती आहार संघटनेने दिली. गॅसचा तुटवडा असताना अशा परिस्थितीमध्ये हॉटेल्स उघडे ठेवायचे की नाही हा निर्णय त्या हॉटेल मालकांचा असेल.

Swiggy and Zomato Services Disrupted
Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कुठे काय स्थिती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com