Bhupesh Baghel : महादेव बेटिंग अॅप प्रकरणाबाबत मोठी अपडेट; माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अडचणीत, पोलिसांत FIR नोंद

Bhupesh Baghel Latest News : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात भूपेश बघेल यांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर नोंद झाला आहे. भूपेश बघेल यांच्याविरोधात विश्वासघात, फसवणूक अशा विविध कलमान्वये एफआयआर नोंद करण्यात आला आहे.
Bhupesh Baghel
Bhupesh BaghelSaam Tv

bhupesh baghel News :

लोकसभा निवडणुकीच्या आधीच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात भूपेश बघेल यांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर नोंद झाला आहे. भूपेश बघेल यांच्याविरोधात विश्वासघात, फसवणूक अशा विविध कलमान्वये एफआयआर नोंद करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये भूपेश बघेल यांच्या व्यतिरिक्त महादेव बेटिंग अॅपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पलसहित १६ अन्य लोकांच्या नावाचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅप प्रकरणामुळे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल चर्चेत होते. ईडीचा दावा आहे की, त्यांनी एक 'कॅश कुरिअर'चा ईमेल स्टेटमेंट रेकॉर्ड केला आहे. यात खुलासा झाला आहे की, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यूएई येथील अॅप प्रमोटरकडून ५०८ कोटी रुपये घेतले. याच प्रकरणी महादेव बुक अॅपच्या मालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या मालकाला मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Bhupesh Baghel
Electoral Bond: निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा नवीन डेटा केला जाहीर, कोणत्या पक्षाला किती मिळाली देणगी?

ईडीच्या कारवाईवर सवाल उपस्थित करत भूपेश बघेल यांनी म्हटलं की, ' एक व्यक्ती महादेव अॅपचा मालक असल्याचा दावा करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तपास करणाऱ्या ईडीला ही बाब माहिती नव्हती. दोन दिवसांपूर्वी ईडी त्या व्यक्तीला मॅनेजर असल्याचं सांगत होती. छत्तीसगडच्या जनतेला सर्व कळत आहे. भाजप आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या ईडीला निवडणुकीत जोरदार उत्तर देऊ'.

Bhupesh Baghel
Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळा प्रकरण, ईडीकडून CM अरविंद केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स

काय आहे महादेव बेटिंग अॅप प्रकरण?

महादेव बेटिंग अॅप ऑनलाइन सट्टेबाजीसाठी तयार करण्यात आलं होतं. या अॅपवर युजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्सच्या नावावर लाईव्ह गेम खेळायचे. या अॅपच्या माध्यमातून क्रिकेट, बॅटमिंटन , टेनिस आणि फुटबॉल सारख्या खेळावर सट्टा लावायचे. तसेच निवडणुकीवरही सट्टा लावण्यात यायचे. या अॅपचं जाळं वेगाने पसरत होतं.

छत्तीसगडमध्ये या अॅपचे अधिक प्रमाणात अकाऊंट होते. महादेव बेटिंग अॅप अनेक शाखेच्या माध्यमातून सुरु होतं. युजर्सला सुरुवातीला फायदा व्हायचा. त्यानंतर नुकसान अधिक व्हायचं. या अॅपमधून झालेल्या नफ्याचा ८० टक्के भाग हे दोघे जण त्यांच्याजवळ ठेवायचे. या अॅपवर पैसा लावणारे फक्त ३० टक्के युजर्सने सट्टा जिंकल्याचं समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com