Electoral Bond: निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा नवीन डेटा केला जाहीर, कोणत्या पक्षाला किती मिळाली देणगी?

Election Commission News: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी निवडणूक आयोगाने एसबीआयकडून मिळालेली इलेक्टोरल बाँड्सची नवीन माहिती आपल्या वेबसाइटवर अपलोड केली आहे.
Election Commission On Electoral Bond
Election Commission On Electoral BondSaam Tv

Election Commission On Electoral Bond:

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी निवडणूक आयोगाने एसबीआयकडून मिळालेली इलेक्टोरल बाँड्सची नवीन माहिती आपल्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याआधी निवडणूक आयोगाने 14 मार्च रोजी इलेक्टोरल बाँडशी संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. कंपन्यांनी खरेदी केलेले इलेक्टोरल बाँड आणि त्यांच्यामार्फत पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती यात समोर आली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक केला आहे. एप्रिल 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर राजकीय पक्षांनी त्यांना इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळालेल्या देणग्यांबाबत निवडणूक आयोगाकडे सादर केलेली ही माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Election Commission On Electoral Bond
Maharashtra Lok Sabha Election : अखेर चंद्रहार पाटील या पक्षाकडून लढणार निवडणूक? सांगलीच्या जागेवर हे दोन पक्ष होते आग्रही

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून निवडणूक आयोगाने ही माहिती न्यायालयाकडे सोपवली होती. आता 15 मार्चच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा सीलबंद लिफाफा निवडणूक आयोगाकडे परत दिला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती सार्वजनिक केली.  (Latest Marathi News)

Election Commission On Electoral Bond
Loksabha Election 2024: रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला 'महायुतीतूनच' विरोध, मोहिते पाटलांच्या बंगल्यावर खलबतं; मोठ्या बंडाची तयारी?

गेल्या गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्या प्रमुख कंपन्यांची माहिती खालीलप्रमाणे...

  • फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस - 1,368 कोटीरुपये

  • मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड - 966 कोटी रुपये

  • क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड - 410 कोटी रुपये

  • वेदांत लिमिटेड - 400 कोटी रुपये

  • हल्दिया एनर्जी लिमिटेड - 377 कोटी रुपये

  • भारती समूह - 247 कोटी रुपये

  • एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड - 224 कोटी रुपये

  • वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन - 220 कोटी रुपये

  • केव्हेंटर फूडपार्क इन्फ्रा लिमिटेड - 194 कोटी रुपये

  • मदनलाल लिमिटेड - 185 कोटी रुपये

  • डीएलएफ ग्रुप - 170 कोटी रुपये

  • यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल - 162 कोटी रुपये

  • जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेड -123 कोटी

  • बिर्ला कार्बन इंडिया - 105 कोटी

  • रुंगटा सन्स - 100 कोटी रुपये

  • डॉ. रेड्डीज - 80 कोटी रुपये

  • पिरामल एंटरप्रायझेस ग्रुप - 60 कोटी रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com