Loksabha Election 2024: रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला 'महायुतीतूनच' विरोध, मोहिते पाटलांच्या बंगल्यावर खलबतं; मोठ्या बंडाची तयारी?

Maharashtra Loksabha Election: माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळत असून निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकटवल्याचे दिसत आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsaam tv
Published On

Madha Loksabha Constituency:

राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरुन मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळत असून निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचे दिसत आहे.

माढा लोकसभेत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (RanjitSinh Naik Nimbalkar) यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याविरोधात नाराज गटाच्या बैठकांना वेग आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी या सर्व विरोधकांची बैठक पार पडली.

या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सातारा डीसीसीचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील शेकाप नेते डॉ .बाबासाहेब देशमुख, आमदार दीपक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. आता या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Nanded News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली; अर्धापूरमधील घटना

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळेच रणजितसिंह यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर यांचा तीव्र विरोध आहे. यावर आता भाजप श्रेष्ठी माढ्यातलं बंड कसं शमवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Nashik Politics : नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, तर महायुतीतही संघर्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com