Maharashtra Lok Sabha Election : अखेर चंद्रहार पाटील या पक्षाकडून लढणार निवडणूक? सांगलीच्या जागेवर हे दोन पक्ष होते आग्रही

Lok Sabha Election 2024/Sangli Constituency : महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची शनिवारी रात्री बैठकीत चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital
Published On

Maharashtra Lok Sabha Election

महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची शनिवारी रात्री बैठकीत चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 21 मार्चला सांगली आणि मिरज मध्ये स्वतः उद्धव ठाकरे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी जनसंवाद मेळावा घेणार आहे. सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीही आग्रही होते.

सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आला होता.लोकसभेच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकला असताना चंद्रहार पाटील देखील मैदानात उतरले आहेत. चंद्रहार पाटील यांनी स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा केली होती.

Maharashtra Lok Sabha Election
Aamshya Padvi Joins Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; आमदार आमश्या पाडवींचा शिंदे गटात प्रवेश

लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून मला ऑफर्स येत आहेत, तर मी ही लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे, असे सांगत चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या आखाड्यात लांघ बांधून तयार असल्याचे दाखवून दिले होते. मी लोकसभा लढवावी, अशी जिल्ह्यातील अनेकांची इच्छा आहे. मीही लोकसभा लढण्यास तयार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगली जिल्ह्यातील विट्यासह अनेक ग्रामीण भागात दौरेही केले आहेत. हे दौरे करताना लोकांच्या भावनाही जाणून घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Maharashtra Lok Sabha Election
Mahavikas Aghadi : वंचितला कोणताही नवीन प्रस्ताव जाणार नाही; मविआच्या बैठकीत एकमत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com