Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळा प्रकरण, ईडीकडून CM अरविंद केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स

ED Summons to Arvind Kejriwal : ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार अरविंद केजरीवाल यांना 1 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam TV

Arvind Kejriwal :

दिल्लीतील कथित दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठवण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल यांना ED कडून हे नववं समन्स पाठवण्यात आलं आहे. नवीन समन्सनुसार अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ईडीने यापूर्वी पाठवलेल्या समन्सनंतरही अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. उलट त्यांनी ईडीलाच पत्र लिहून ही राजकीय सुडापोटी कारवाई असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल चौकशीला हजर राहत नसल्याने ED ने कोर्टात देखील धाव घेतली होती. तिथून अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मिळाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal
Mahavikas Aghadi : वंचितला कोणताही नवीन प्रस्ताव जाणार नाही; मविआच्या बैठकीत एकमत

यापूर्वीच्या समन्सवर हजर न राहिल्याप्रकरणी केजरीवाल यांना शनिवारी कोर्टातून जामीन मिळाला. यापूर्वी गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि या वर्षी 3 जानेवारी, 18 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारीलाही ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. (latest politics news)

Arvind Kejriwal
Maharashtra Politics: ब्रेकिंग! २ दिवसात माफी मागा अन्यथा... शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. असिम सरोदेंना नोटीस

केजरीवाल यांना २ प्रकरणांमध्ये समन्स

आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेत ईडीवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, काल संध्याकाळी ईडीने केजरीवाल यांना आणखी एक समन्स पाठवले. अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात समन्स बजावण्यात आली आहे.

आधी दिल्ली दारू धोरण प्रकरणात नववे समन्स पाठवण्यात आले आहे आणि दुसरे म्हणजे, दिल्ली जल बोर्ड प्रकरणात पहिले समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांना जल बोर्ड प्रकरणात 18 मार्च आणि दारू घोटाळा प्रकरणी 21 मार्चला चौकशीसाठी बोलावले आहे.

निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आम्हाला माहिती नाही. समन्समध्ये कोणताही तपशील नाही. ईडी, सीबीआय आणि आयकर केंद्र सरकारचे हत्यार बनलं आहे. या माध्यमातून निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आतिशी यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com