Maharashtra Politics: ब्रेकिंग! २ दिवसात माफी मागा अन्यथा... शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. असिम सरोदेंना नोटीस

Shivsena Notice To Advocate Asim Sarode: या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
Asim Sarode
Asim Sarode Saam Tv

Maharashtra Politics News:

शिवसेनेचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा ऍडव्होकेट असिम सरोदे यांनी केला होता. या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शिवसेना शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत पुन्हा परतणार असल्याचा मोठा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला होता. चंदपूर येथील 'निर्भय बनो' सभेत बोलताना त्यांनी याबाबतचे विधान केले होते. तसेच या आमदारांची यादीही असिम सरोदे यांनी वाचू दाखवली होती.

याप्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून असिम सरोदे (Asim Sarode) यांनी नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार, असे या या नोटीसमध्ये म्हटले असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


Asim Sarode
Shahada Accident : बिथरलेला बैल कारची काच फोडून घुसला आत; दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण बचावले

कोण आहेत असिम सरोदे?

अमिस सरोदे हे प्रसिद्ध वकिल आहेत. त्यांचा भारतीय संविधानाचा तसेच कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. अनेक राजकीय, सामाजिक विषयांवर ते परखडपणे भाष्य करत असतात. तसेच ते निर्भय बनो चळवळीचेही सदस्य आहेत. या सभेदरम्यानच केलेल्या भाषणामुळे त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Asim Sarode
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com