Maharashtra Politics: 'न्याय यात्रेची नाटक कंपनी..' बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्वीट करत भाजपने ठाकरेंना डिवचले!

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: खासदार राहुल गांधी हे शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray, saam tv

Chandrashekhar Bawankule News:

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईमध्ये समारोप होत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांची विराट सभेने या यात्रेचा समारोप होईल. त्याआधी खासदार राहुल गांधी हे शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे?

"शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली,"

‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे."

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Ashok Chavan : भाजप खासदार अशोक चव्हाण मनोज जरांगेच्या भेटीला; ताफा दूर थांबवून साध्या वाहनात पोहचले

तसेच आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Navneet Rana News : लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, भाजप पक्षप्रवेशाबाबत नवनीत राणा यांचं सूचक वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com