Navneet Rana News : लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, भाजप पक्षप्रवेशाबाबत नवनीत राणा यांचं सूचक वक्तव्य

Amravati Loksabha Election 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील, त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं.
 Navneet Rana
Navneet RanaSaam TV

अमर घटारे | अमरावती

Amravati News :

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलीत अशी शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे. आता नवनीत राणा यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये, असं नवनीत राणा म्हटलंय.

तर भाजप प्रवेशावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीमागे राहतील. जो काही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील, त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

 Navneet Rana
Nashik Politics : नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, तर महायुतीतही संघर्ष

रवी राणा यांनी याबाबत म्हटलं की, एखाद्या परिवारातील व्यक्ती दुसऱ्या परिवारामध्ये जाते तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात. ज्या खासदाराला युवा स्वाभिमान पक्षाने निवडून दिलं, त्याला देशातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येणारच. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशाच्या विकासासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान काम करत आहेत. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांसोबत काम करण्यासाठी आमचा खासदार देता येत असेल तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्यासोबत युवा स्वाभिमान पार्टी व मी स्वतः ताकतीने उभा आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलं.

 Navneet Rana
Sanjay Raut News: वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी... संजय राऊतांचं मोठं विधान

नवनीत राणांविरोधात प्रचार करणाऱ्यावर कारवाई होणार?

जे लोक एनडीएच्या घटक पक्षाचं इमानदारीने पालन करणार नाही, त्यांच्याविरोधात नक्कीच एनडीएच्या माध्यमातून कारवाई करायला लावू. येणाऱ्या काळात सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणा यांच्या मंचावर दिसतील आणि प्रचार करतील. कुणी पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार करत असेल तर त्याच्यावर पक्ष कारवाई करणार आहे, असा दम रवी राणा यांनी स्थानिक नेत्यांना भरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com