Shahada Accident : बिथरलेला बैल कारची काच फोडून घुसला आत; दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण बचावले

Nandurbar News : गुरांचा कळप येत होते. हे पाहून डॉ. चौधरी यांनी कार रस्त्याच्या बाजूला थांबविली. गुरांच्या कळपातील बिथरलेल्या एका बैलाने पुढील बाजूने कारवर चढाई केली.
Shahada Accident
Shahada AccidentSaam tv

सागर निकवाडे 

नंदूरबार : देव तारी त्याला कोण मारी? या सुवचनाचा प्रत्यय दामळदा (ता.शहादा) येथील उपसरपंच डॉ. विजय चौधरी व (Nandurbar) कुटुंबातील सदस्यांनी अनुभवला. बिथरलेल्या बैलाने समोरून येणाऱ्या कारवर उडी मारत समोरची काच फोडून थेट आत घुसला. मात्र दैव बलवत्तर म्हणून कारमधील (Accident) सहाही जण सही सलामत बचावले आहेत. या घटनेची सोशल मीडियातून तसेच संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Shahada Accident
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

शहादा (Sahahda) तालुक्यातील आदर्श गाव दामळदा येथील उपसरपंच डॉ. विजय चौधरी कुटुंब हे शहादा येथील (Marriage) विवाह समारंभातून परत येत होते. या दरम्यान टुकी गावाच्या बस थांब्याजवळ रस्त्याने गुरांचा कळप येत होते. हे पाहून डॉ. चौधरी यांनी कार रस्त्याच्या बाजूला  थांबविली. गुरांच्या कळपातील बिथरलेल्या एका बैलाने पुढील बाजूने कारवर चढाई केली. क्षणार्धात बैल पुढील काच फोडत थेट आत घुसला. मात्र प्रसंगावधान राखत उपसरपंच डॉ. विजय चौधरी यांच्यासह कारमधील अन्य पाचही जण कारचे दरवाजे उघडून बाहेर निघाल्यामुळे थोडक्यात बचावले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shahada Accident
Maharashtra Navnirman Sena : मनसैनिकांचा कृषी अधिकारी कार्यालयात राडा, यवतमाळमधील शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचा-याला चाेपले

या घटनेत सदर बैल कारची पुढील काच शिंगाने फोडून थेट कारमध्येच घुसला. बैलाचे शीर व शरीराचा अर्धा भाग कारमध्ये तर अर्धे धड व मागील दोन पाय कारच्या बाहेर अशी भयानक स्थिती होती. हे दृश्य पाहणाऱ्याचा अंगावर शहारे आणणारे होते. जखमी झालेल्या सदर बैलाला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, दैव बलवत्तर होते म्हणून कारमधील आम्ही सर्व जण वाचलो. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com