Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena
Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena Saam TV

Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Loksaha Election 2024: ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आणखी एका आमदाराने साथ सोडल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. १७ मार्च २०२४

Nandurbar Breaking News:

एकीकडे लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाच ठाकरे गटाची गळती सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला असून ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आणखी एका आमदाराने साथ सोडल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या वतीने आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena
Maharashtra Politics: 'न्याय यात्रेची नाटक कंपनी..' बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्वीट करत भाजपने ठाकरेंना डिवचले!

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. परंतु तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena
Ashok Chavan : भाजप खासदार अशोक चव्हाण मनोज जरांगेच्या भेटीला; ताफा दूर थांबवून साध्या वाहनात पोहचले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com