Celebrity Cast Voting In Lok Sabha Election 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lok Sabha Election 2024 : "मी अब्बा डब्बा जब्बा करूनच मतदान केलं...", मतदानानंतर जॉनी लिव्हरची मिश्किल टिप्पणी

Chetan Bodke

आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. आज महाराष्ट्रात ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभेच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सामान्य नागरिकांसह अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावत आहे.

मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली की, "यंदाच्या लोकसभेसाठी सर्वत्र लोकांमध्ये उत्साह दिसत आहे. अपेक्षा खूप असतात, फार अपेक्षा ठेऊन काही उपयोग नाही. सर्वकाही परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे सर्वात आधी आपण मतदानाचा हक्क बजवायला हवा. खरंतर खासदार लोकांचं काम करणारा हवा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हवा. त्यामुळे मतदारांनो आज तुम्हाला संधी आहे, लोकांचं काम करणाऱ्या खासदारालाच निवडून द्या. मला राजकारणात रस नाही, त्यामुळे मी त्यामध्ये फारसा पडत नाही. घराच्या बाहेर पडावे आणि मतदान करावे. कारण त्यावरच पुढचे भविष्य ठरणार आहे. परिवर्तन व्हायला पाहिजे पण लोकांचे अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे बाकीचं परिवर्तन मला अपेक्षित नाही. अशी प्रतिक्रिया अभिनेते अशोक सराफ यांनी दिली आहे."

अभिनेता अर्शद वारसीनेही मतदान केल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. " ही निळी शाई आपली परिस्थिती बदलू शकते. देशही बदलू शकते. त्यामुळे मतदारांनो मतदान करणं फार महत्वाचं आहे. योग्य त्या उमेदवाराचीच निवड करा. लोकशाहीचा हा उत्सव पाच वर्षाने एकदाच येतो. त्यामुळे योग्य त्या लोकप्रतिनिधींची निवड करणं फार महत्वाचं आहे."

अभिनेता जॉनी लिव्हरनेही मतदान केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. " सर्वांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा. आपल्या देशाचा योग्य विकास होण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करणं फार महत्वाचं आहे. मी अब्बा डब्बा जब्बा करूनच मतदान केलं आहे."

यावेळी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अर्शद वारसी, सोनाली कुलकर्णी, आदेश बांदेकर, जॉनी लिव्हर, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, मलायका अरोरा, समीर चौघुले, मिलिंद गवळी, अनुप जलोटा, सुनिधी चौहान, हेमा मालिनी, ईशा देओल, धर्मेंद्र, केदार शिंदे, इम्रान खान, श्रेयस तळपदे, हृतिक रोशन, प्रशांत दामले, शोभा खोटे, अनिल कपूर, नाना पाटेकर, कैलाश खेर, मिलिंद गुणाजी, किरण राव, आमिर खान, आशा भोसले सह अनेक सेलिब्रिटींनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT