Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट

Chhaya Kadam At Cannes Film Festival 2024 : मराठमोळा लूक करत छाया कदमने कान्स फेस्टिव्हलमध्ये फॅशनचा जलवा दाखवला आहे. फेस्टिव्हलमध्ये सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास आईसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट
Chhaya Kadam At Cannes Film Festival 2024Saam Tv

सध्या सर्वत्र कान्स फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरू आहे. या फेस्टिव्हलसाठी हॉलिवूडसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी गेले आहेत. अशातच आता एक मराठमोळी अभिनेत्रीही या फेस्टिव्हलसाठी गेलेली आहे. मराठमोळी अभिनेत्री छाया कदमनेही २०२४ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केलं आहे. मराठमोळा लूक करत छाया कदमने कान्स फेस्टिव्हलमध्ये फॅशनचा जलवा दाखवला आहे. फेस्टिव्हलमध्ये सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास आईसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट
लक्झरीयस कार आणि अलिशान घर; इतक्या कोटींचा मालक आहे Jr NTR

शेअर केलेल्या पोस्टमध्ये छाया कदम यांनी लिहिले की, "आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू" आईची साडी, नथ, केसात गजरा, कपाळावर टिकली असा छाया कदम यांचा हा मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

छाया कदम या मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. १५ मे रोजी मुंबईतून फ्रान्समध्ये फेस्टिव्हलसाठी रवाना झाल्या होत्या. छाया कदम फेस्टिव्हलमध्ये 'लापता लेडीज' चित्रपटानिमित्त गेल्या आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार केली आहे. आजवर या फेस्टिव्हलमध्ये अनेक अभिनेत्रींना आपण वेस्टर्न लूकमध्ये पाहिले असेल, पण पहिल्यांदाच या फेस्टिव्हलसाठी पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात छाया कदम यांची एन्ट्री पाहायला मिळाली.

Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट
Maharashtra Lok Sabha Election 2024 : मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला लोकशाहीचा उत्सव, चाहत्यांना केलं मतदान करण्याचं आवाहन

छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, किरण रावच्या 'लापता लेडिज' चित्रपटात मंजू माईची भूमिका छाया कदमने साकारली होती. त्याआधी 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटातही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय छाया यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी' सह अनेक चित्रपट गाजले आहेत.

Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट
Paresh Rawal News : "मतदान न करणाऱ्यांना सरकारने कडक शिक्षा द्यायला हवी"; अभिनेते परेश रावल संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com