Maharashtra Lok Sabha Election 2024 : मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला लोकशाहीचा उत्सव, चाहत्यांना केलं मतदान करण्याचं आवाहन

Marathi Celebrities Voting News : सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांसोबतच अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही आज मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला लोकशाहीचा उत्सव, चाहत्यांना केलं मतदान करण्याचं आवाहन
Marathi Celebrities Voting Lok Sabha Election 2024Saam Tv
Published On

देशभरात आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच एकूण १३ मतदारसंघात मतदान होणार आहे. आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटीही आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही आज मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला लोकशाहीचा उत्सव, चाहत्यांना केलं मतदान करण्याचं आवाहन
Paresh Rawal News : "मतदान न करणाऱ्यांना सरकारने कडक शिक्षा द्यायला हवी"; अभिनेते परेश रावल संतापले

मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री सुकन्या मोने, स्पृहा जोशी, सुनील बर्वे, गौरव मोरे, आदिती सारंगधर, श्वेता मेहंदळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अनेक सेलिब्रिटींनी "आम्हीही आमचा मतदानाचा अधिकार बजावून आलो आहोत, तुम्ही ही केलेत ना मतदान?" असं कॅप्शन देत फोटो शेअर केलेले आहेत.

अक्षय कुमार, जान्हवी कपूर, फरहान अख्तर, झोया अख्तर, राजकुमार राव, परेश रावल, सान्या मल्होत्रा सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. काल अनेक सेलिब्रिटींनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. शाहरुख खान, अक्षय कुमारने नागरिकांनी मतदान करण्यास सांगितले आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला लोकशाहीचा उत्सव, चाहत्यांना केलं मतदान करण्याचं आवाहन
Jr. NTRची भलतीच क्रेझ; म्युझिक लाँचिंगसाठी आले होते १० लाख चाहते, तरीही ठरला चित्रपट फ्लॉप

मुंबईत आज पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com