Jr. NTRची भलतीच क्रेझ; म्युझिक लाँचिंगसाठी आले होते १० लाख चाहते, तरीही ठरला चित्रपट फ्लॉप

Jr. NTR Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक म्हणजे ज्युनिअर एनटीआर. आज त्याचा ४१ वा वाढदिवस आहे.
Jr. NTR Birthday
Jr. NTR BirthdayInstagram

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक म्हणजे ज्युनिअर एनटीआर. टॉलिवूड अभिनेता ज्युनिअर एनटीआर याला वेगळ्या लोकप्रियतेची गरज नाही. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडली आहे. ज्युनियर एनटीआरची फॅन फोलोविंग फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात आहे. अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा आज ४१ वा वाढदिवस आहे. त्याचं खरं नाव नंदामुरी तारका रामाराव असं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टारने नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. ज्युनिअर एनटीआरचे चाहते एवढे आहेत की, एका गाण्याच्या लाँचसाठी जवळपास १० लाख चाहत्यांनी हजेरी लावली होती.

Jr. NTR Birthday
Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

अभिनेत्याला पाहण्यासाठी त्याचे लाखो चाहते अगदी स्पेशल ट्रेन करून आले होते. किस्सा आहे, २००४ मधला... १ जानेवारी २००४ रोजी ज्युनियर एनटीआर याचा ‘आंध्रवाला’ नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. रिलीजपूर्वी या चित्रपटाचा म्युझिक लॉन्चिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. त्या इव्हेंटसाठी स्पेशल ज्यु. एनटीआरला पाहण्यासाठी तब्बल १० लाख लोकं कार्यक्रमात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी सरकारने १० विशेष रेल्वे ट्रेन्सही सोडल्या होत्या. या इव्हेंटसाठी जाणाऱ्या लोकांची सरकारने पूर्ण व्यवस्था केली होती. मात्र, एनटीआरला पाहण्यासाठी इतके लोकं येतील याची कल्पना खुद्द अभिनेत्यालाही नव्हती. पण जरीही त्या कार्यक्रमाला एनटीआरचे इतके चाहते आले असले तरीही त्या कार्यक्रमात कोणतीही चेंगरा चेंगरी झाली नाही.

‘आंध्रवाला’ चित्रपटाचा म्युझिक लॉन्चिंग इव्हेंट अपेक्षेपेक्षाही मोठा झाला. पण असलं तरीही त्याचा फायदा चित्रपटाला झाला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे १४ कोटींचे बजेट होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. जेमतेम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ७ कोटींचीच कमाई केली. एनटीआर लोकांमध्ये त्याच्या खास स्टाईलमुळे, अभिनयामुळे आणि लूक मुळे प्रचंड लोकप्रिय आहे. जेव्हाही एनटीआरचा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर एका सणाप्रमाणेच सेलिब्रेशन करतात. ज्युनिअर एनटीआरने बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. एनटीआरने ८ व्या वर्षी 'ब्रम्हर्षी विश्वमित्र' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल टाकले. ज्युनिअर एनटीआरचा आरआरआर चित्रपटाला जगभरात चाहत्यांनी खूप प्रेम दिले होते.

Jr. NTR Birthday
Loksabha Election 2024: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसोबत अनेक सेलिब्रिंटीनी केलं मतदान, चाहत्यांनाही केलं आवाहन

येत्या काळात एनटीआरचे बॉक्स ऑफिसवर दोन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. पहिला चित्रपट ‘देवरा’, त्याची निर्मिती ३०० कोटींमध्ये झाली आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. दुसरा चित्रपट YRF स्पाय युनिव्हर्सचा ‘वॉर २’, हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com