Akshar Kothari SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshar Kothari: मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत वाचून बसेल धक्का

Akshar Kothari New Car Price : 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अक्षर कोठारीने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. त्याच्या नव्याकोऱ्या कारची पहिला झलक पाहा.

Shreya Maskar

नवीन वर्ष मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसाठी खूप खास ठरत आहे. या वर्षी पहिल्या महिन्यातच अनेक कलाकारांची लग्न झाली, काहींनी नवीन घर घेतले तर काही कलाकारांनी नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. यात आता अजून एक कलाकाराची एन्ट्री झाली आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Laxmichya Paulanni) फेम अभिनेता अक्षर कोठारीने (Akshar Kothari) देखील आता आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी देली आहे. त्याच्या घरात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे.

अक्षरने सोशल मिडिया एक खास व्हिडीओ शेअर करूनही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अक्षर कोठारीने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. त्याने आपल्या नवीन महागड्या गाडीची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अक्षरच्या आलिशान गाडीचे नाव 'जीप कंपास मॉडेल एस' असे आहे. सध्या अक्षरवर चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये अक्षर नव्या कारची पूजा करताना पाहायला मिळत आहे. कारच्या शोरूममध्ये देखील खूप खास सजावट करण्यात आली आहे. अक्षरच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याची आजवरची मेहनत सांगून जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'जीप कंपास मॉडेल एस' या आलिशान गाडीची किंमत 28 लाख ते 32 लाख इतकी आहे. अक्षर कोठारीची नवीन कार काळ्या रंगाची आहे. गाडीचे मॉडेल खूपच कमाल आहे.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत अक्षर मुख्य भूमिकेत पाहायला मिळेत आहे. या मालिकेतील त्याच्या पात्राचे नाव अद्वैत चांदेकर असे आहे. गेले अनेक वर्ष अक्षर आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावत आहे. त्याची 'छोटी मालकीण' ही मालिका खूप गाजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल बंद, २० दिवसांसाठी पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

SCROLL FOR NEXT