Veer Pahariya: वीर पहारियाची मराठी ऐकून चाहते पडले चाट, VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून होतय कौतुक

Veer Pahariya Viral Video : बॉलिवूड अभिनेता वीर पहारियाने 'स्काय फोर्स' चित्रपटादरम्यान थिएटरमध्ये चाहत्यांसोबत मराठीत साधला संवाद आहे. तो नेमके काय म्हणाला, जाणून घ्या.
Veer Pahariya Viral Video
Veer PahariyaSAAM TV
Published On

सध्या बॉक्स ऑफिसवर 'स्काय फोर्स'चा (Sky Force) डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मन जिंकले आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया (Veer Pahariya) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'स्काय फोर्स' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'स्काय फोर्स' चित्रपटात युद्धाची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असताना सोशल मीडियावर अभिनेता वीर पहारियाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये वीर चाहत्यांसोबत चक्क मराठीत संवाद साधताना पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता वीर पहारिया हाऊसफुल थिएटरमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधताना, त्यांच्या सोबत बेभान होऊन नाचताना आणि चित्रपट पाहताना दिसला.

चित्रपट पाहायला आलेल्या एका महिलेने वीर पहारियाशी संवाद साधला. ती चाहती म्हणाली की, "तुम्ही खूप छान काम केले. मला वाटल नव्हतं की तुम्ही चित्रपटाच्या शेवटी जाल असे...मला वाटले होत की तुम्ही शेवटी परत याल. स्टोरी खूप बदलली." यावर उत्तर देत वीर म्हणाला, "माझी पण पहिल्यांदा अशीच रिएक्शन होती जेव्हा मी स्टोरी वाचली. मी पण तयार होते की, ते मला परत घेऊन येतील. मग मी क्रॅशच ऐकले तर टिश्यू बॉक्समधले सर्व टिश्यू काढून मी सर्व डोळे पुसत होतो. तुमचा आशीर्वाद असेल तर मी अजून सिनेमात काम करणार. वेगळ्या वेगळ्या भूमिका साकारणार."

चित्रपट संपल्यावर वीर पहारियाने चाहत्यांशी संवाद साधला. सर्वत्र अक्षय कुमार आणि वीर पहारियाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहेत. 'स्काय फोर्स' चित्रपटातून वीर पहारिया याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. भारत-पाकिस्तान हल्ल्याची कथा चित्रपटात सांगण्यात आली आहे.

Veer Pahariya Viral Video
HBD Shruti Haasan : आलिशान घर अन् महागड्या गाड्या…, श्रृती हासन आहे कोट्यवधींची मालकीण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com