chhaava Movie: अक्षय खन्नापूर्वी 'या' कलाकारांनी साकारली होती क्रूर औरंगजेबाची भूमिका; 'या' कवीचा देखील समावेश

chhaava Movie: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्यामध्ये अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेने लोकांचे सर्वाधिक लक्ष वेधले.
Aurangzeb role
Aurangzeb roleSaam Tv
Published On

chhaava Movie: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, यामध्ये अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेने लोकांचे सर्वाधिक लक्ष वेधले. दरम्यान असे अनेक स्टार आहेत ज्यांना औरंगजेबाची भूमिका साकारल्याबद्दल प्रशंसा मिळाली आहे. जाणून घेऊयात कोणी कोणी साकारली होती ही भूमिका.

विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित 'छवा' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडतोय. या चित्रपटातील पात्रांच्या लूकबद्दल बरीच चर्चा सुरू आहे, यामध्ये अक्षय खन्नाची सर्वाधिक चर्चा होत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये त्याच्या क्रूर लूकचे कौतुक केले जात आहे.

Aurangzeb role
Mamta Kulkarni: टॉपलेस फोटोशूट, यशस्वी करिअर, अंडरवर्ल्ड कनेक्शन ते संन्यासी; ममताचा महामंडलेश्वरपर्यंत प्रवास

'छावा' बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट १४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीनवावर आधारित आहे, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशल साकारत आहे, तर त्यांची पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदाना साकारत आहे. तर,अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे, मात्र, अक्षयच्या आधीही अनेक कलाकारांनी औरंगजेबाची भूमिका साकारून लोकांची मने जिंकली आहेत.

Aurangzeb role
Shah rukh khan and kartik aaryan: 'पधारो म्हारे आयफा'; किंग खानने दिले कार्तिकला राजस्थानी भाषेचे धडे

ओम पुरी

यामध्ये पहिले नाव ओम पुरींचे आहे, जे पहिल्यांदा इंडस्ट्रीत औरंगजेबाच्या भूमिकेत दिसले. ओम पुरी यांनी १९८८ च्या ऐतिहासिक नाटक 'भारत एक खोज' मध्ये ही भूमिका साकारली होती. ही ५३ भागांची टीव्ही मालिका होती. श्याम बेनेगल यांनी या मालिकेचे दिग्दर्शिन केले होते. या मालिकेद्वारे ओम पुरी यांनी या व्यक्तिरेखेवर आपली खास छाप सोडली आहे.

यतीन कार्येकर

ओम पुरी यांच्यानंतर, यतीन कार्येकर यांना या भूमिकेत पाहिले गेले होते, त्यांनी 'राजा शिवछत्रपती' या मराठी ऐतिहासिक नाटकात ही भूमिका साकारली होती. हे नाटक २००१ मध्ये आले. लोकांना हे नाटक इतके आवडले की कोरोना महामारीच्या काळात १९ वर्षांनी ते पुन्हा प्रसारित करण्यात आले.

आशुतोष राणा

२०२१ मध्ये आशुतोष राणा यांनी 'छत्रसाल' मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारली होती. ही मालिका MX Player वर प्रदर्शित झाली. या भूमिकेबद्दल अभिनेत्याने म्हटले होते की ही भूमिका आव्हानांनी भरलेली होती. तो म्हणाला की हे पात्र जितके शक्तिशाली आहे तितकेच ते भयंकर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com