Shah rukh khan and kartik aaryan: 'पधारो म्हारे आयफा'; किंग खानने दिले कार्तिकला राजस्थानी भाषेचे धडे

iifa 2025 : आयफाच्या प्री-इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि कार्तिक आर्यन यांनी राजस्थानी शैलीत लोकांची मने जिंकली. यावेळी आयफा २५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि त्याची थीम राजस्थानी आहे.
SRK and kartik aaryan IIFA 2025 Pre Event
SRK and kartik aaryan IIFA 2025 Pre EventSaam Tv
Published On

iifa 2025 : शाहरुख खान आणि कार्तिक आर्यन अलीकडेच मुंबईत झालेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) अवॉर्ड्स २०२५ च्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली. या वर्षी आयफा जयपूरमध्ये होणार आहे, यावर्षी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी २५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. या निमित्ताने मुंबईत राजस्थानी थीमवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान शाहरुख खान आणि कार्तिक आर्यन देखील एका खास शैलीत दिसले, जिथे किंग खानने कार्तिक आर्यनला अभिनय यानि राजस्थानी भाषेचे धडे दिले.

शाहरुख खानने अनेक पुरस्कार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे, त्यासोबतच त्याच्याकडे लोकांचे मनोरंजन करण्याची उत्तम कला देखील आहे. अलिकडेच तो कार्तिक आर्यनला मजेदार पद्धतीने ही कला शिकवताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे. शाहरुख खानने गमतीत म्हटले की कार्तिक यावेळी आयफाच्या २५ व्या वर्षाचे आयोजन करणार आहे, ज्यासाठी मी तुला होस्टिंग करायची कशी ते शिकवेन.

SRK and kartik aaryan IIFA 2025 Pre Event
Mamta Kulkarni: टॉपलेस फोटोशूट, यशस्वी करिअर, अंडरवर्ल्ड कनेक्शन ते संन्यासी; ममताचा महामंडलेश्वरपर्यंत प्रवास

शाहरुख खानने कार्तिकला राजस्थानी शिकवली

यावेळी शाहरुख खानने कार्तिक आर्यनला राजस्थानी शिकवले. जयपूरमध्ये हा कार्यक्रम कसा सुरू करायचा याची विशेष जबाबदारी मी तुला देतो, असे शाहरुखने सांगितले. शाहरुख खानने कार्तिकला सांगितले की, सर्वप्रथम तुला सुरुवात करावी लागेल, त्यासाठी तुला 'पधारो म्हारे आयफा' म्हणावे लागेल. किंग खानने ही ओळ म्हटल्यानंतर कार्तिकने तीच ओळ पुन्हा म्हटली आणि त्यानंतर लगेचच शाहरुखने त्याला राजस्थानी भाषेत आणखी एक गोष्ट सांगितली की, पधारो म्हारे देश राजस्थान

SRK and kartik aaryan IIFA 2025 Pre Event
Urmila Kothare : 'मी पडून नाही राहिले'; अपघातातून वाचल्यानंतर उर्मिला अशी घेते स्वतःची काळजी!

यानंतर, दोन्ही कलाकारांनी हात जोडून सर्वांना "खम्मा गनी" म्हटले आणि लोकांसमोर नम्रपणे हात जोडले. यावेळी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री राजकुमारी दिया कुमारी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. दोन्ही स्टार्सनी त्यांच्यासोबत फोटो काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com