
Mamta Kulkarni Controversy: ९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या ममता कुलकर्णीने तिच्या आयुष्यात एक मोठे पाऊल उचलले आहे. ही अभिनेत्री महाकुंभाला गेली आणि तिने संन्यास घेतला. २४ जानेवारी रोजी ममता किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवण्यात आल्याचे वृत्त आहे.
काही वर्षांपूर्वी ममताने सांगितले होते की ती योगिनी झाली आहे आणि आता तिच्या संन्यासाच्या बातम्या चर्चेत आहेत. तसेच, ममताने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, जसे की वक्त हमारा है, क्रांतीवीर, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, आंदोलन, चायना गेट आणि इतर. तिचे गुप चुप गुप चुप हे गाणे आजही सर्वांना आठवते. ममता तिच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे, पण तिच्याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विवाद आहेत.
ममता कुलकर्णीचा टॉपलेस पोज
१९९३ मध्ये, ममता कुलकर्णी एका मासिकासाठी टॉपलेस पोज देऊन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली कारण खूप कमी अभिनेत्री अशा प्रकारची फोटोशूट केलं होत, पण ममताने ते केले.
ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन
८० आणि ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचा बॉलिवूडवर मोठा प्रभाव होता हे आपण अनेक चित्रपटांमध्ये ऐकले आहे आणि पाहिले आहे. त्यामुळे, ममता कुलकर्णी गँगस्टर छोटा राजनला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. दरम्यान, छोटा राजन देश सोडून गेल्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले.
ममता कुलकर्णी ड्रग्ज प्रकरण
२०१६ मध्ये, करण अर्जुन अभिनेत्री ड्रग्ज तस्करी प्रकरणात अडकली होती, ज्यामध्ये तिचा पती विक्की गोस्वामी देखील सहभागी होता. ममतावर आरोप असतानाही ती नेहमीच निर्दोष असल्याचा दावा करत राहिली. तसेच, ममता गेल्या वर्षी भारतात परतली आणि लोकांना अपेक्षा होती की ती एकतर बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल किंवा अभिनयात पुनरागमन करेल. परंतु, तिने सांगितले होते की तिला पुन्हा बॉलीवूडमध्ये रस नाही आणि आता ममता संन्यासी झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.