HBD Shruti Haasan : आलिशान घर अन् महागड्या गाड्या…, श्रृती हासन आहे कोट्यवधींची मालकीण

HBD Shruti Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री श्रृती हासनचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिची एकूण संपत्ती किती, जाणून घेऊयात.
HBD Shruti Net Worth
HBD Shruti HaasanSAAM TV
Published On

बॉलिवूडची अभिनेत्री श्रृती हासनचा (Shruti Haasan) आज (28 जानेवारी ) वाढदिवस आहे. आता श्रृती 39 वर्षांची झाली आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. श्रृती हासन बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत येते. श्रृती हासन अभिनेता, डान्सर, दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता कमल हासन यांची मुलगी आहे. श्रुती हासनचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला.

बॉलिवूडची सुरपकूल अभिनेत्री श्रृती हासनचे शिक्षण चेन्नईमध्ये झाले. त्यानंतर ती कामासाठी मुंबईला शिफ्ट झाली. श्रुतीला लहानपणापासून गाण्याची खूप आवड होती. श्रुतीने आजवर गब्बर सिंह, रमैया वस्तावैया, गब्बर इज बॅक आणि वेलकम बॅक यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. श्रृती हासनचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 24.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या विविध लूकचे फोटो श्रृती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते.

श्रृती हासन नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, श्रृती हासनची एकूण संपत्ती 80.0 कोटी आहे. श्रृती हासन तेलुगू सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. श्रृती हासन एका चित्रपटासाठी जवळपास 8 कोटी रुपये मानधन घेते. तर जाहिराती आणि बँड कनेक्शन मधून जवळपास 50 लाथ रुपये कमावते. श्रुतीचे मुंबईत आलिशान घर आहे. श्रृती हासनकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. त्यात रेंज रोव्हर स्पोर्ट, ऑडी Q7 अशा महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

श्रृती हासनने लहानपणी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तिने अनेक तेलुगू चित्रपटात देखील काम केले आहे. श्रृती हासनला अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्रृती हासनने संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. श्रृती हासन कायमच आपल्या लूकने चाहत्यांना भुरळ घालते.

HBD Shruti Net Worth
Shreyas Talpade Birthday: आज ओळख अन् चार दिवसात लग्नाची मागणी; श्रेयस आणि दीप्तीची क्युट लव्हस्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com