Shreyas Talpade Birthday: आज ओळख अन् चार दिवसात लग्नाची मागणी; श्रेयस आणि दीप्तीची क्युट लव्हस्टोरी

Shreyas Talpade Birthday Special : श्रेयस तळपदे त्याच्या पत्नी दीप्तीला त्याच्या अभिनय कारकिर्दीत नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे श्रेय देतो. पण त्यांची लव्ह स्टोरी नक्की कशी बहरत गेली हे फार कमी लोकांना माहिती आहे.
Shreyas and dipti
Shreyas and diptiInstagram
Published On

Shreyas Talpade Birthday: बहुमुखी अभिनेता आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट श्रेयस तळपदेचा आज २७ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. २०२३ मध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या या अभिनेताने सलग दोन प्रोजेक्ट्समध्ये काम सुरू केले आहे. दरम्यान, करियरमधील चढ-उतार सुरु असताना नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे श्रेय तो त्याची पत्नी दीप्तीला देतो. पण या दोघांची ही गोड जोडी जमली कशी हे फार कमी लोकांना माहिती आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रेयसच्या प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात .

४ दिवसांत दीप्तीला लग्नाचा प्रस्ताव

श्रेयस तळपदेने २००४ मध्ये दीप्तीशी लग्न केले. या जोडप्याला आद्या नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल श्रेयस म्हणाला, "जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा तो माझ्यासाठी 'दिल में बाजी गिटार'सारखा क्षण होता आणि चार दिवसांत मी तिला लगेच सांगितले, मी तिला म्हणालो मला वाटते की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.' आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की मी खूप भाग्यवान आहे की मला योग्य व्यक्ती मिळाली जिने माझ्यासाठी आणि माझ्या करिअरसाठी खूप त्याग केला. तिने माझ्यासाठी कुटुंबाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला,”

Shreyas and dipti
Bobby Deol Birthday Special: नव्वदीचा हिरो, फ्लॉप करियर ते बिगेस्ट व्हिलन; लॉर्ड बॉबी देओलचा आश्चर्यकारक प्रवास

तो पुढे म्हणाला, “घटस्फोट आणि वेगळे होण्याच्या संख्येमुळे मला वाईट वाटते. माझा लग्न परंपरेवर वर विश्वास आहे. मला घरी गेल्यावर माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पत्नीसोबत माझा दिवस कसा हे शेअर करायला आवडते. घरी ऐकण्यासाठी कोणीतरी आहे, कोणीतरी आहे ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत आहात, स्वतःसाठी ते करण्यात काहीच मजा नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही करता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अमूल्य असतो. जर ते तुमच्यासोबत आनंदी असतील तर मला वाटते की तुम्ही आयुष्यात सफल झाला आहात.

Shreyas and dipti
Saif Ali Khan: सैफवरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिंगरप्रिंट रिपोर्ट निगेटिव्ह, पश्चिम बंगाल कनेक्शन समोर

श्रेयस तळपदेचे आगामी चित्रपट

श्रेयस पुढील वर्षी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव आणि गायक-बंधू दलेर मेहंदी आणि मिका सिंग हे कलाकार आहेत. अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याने काजल अग्रवालसोबत 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू केले आहे. चेतन डीके दिग्दर्शित आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज निर्मित हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com