
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सैफवर हल्ला करणारा आरोपी सध्या कोठडीत आहे. पण, आरोपीच्या वकिलांकडून एक मोठा दावा केला जात आहे. सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती आणि आरोपी वेगळे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी गेला होता. रविवारी मुंबई पोलिसांच्या तपासाला मोठा खुलासा झाला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शहजादच्या बोटांचे ठसे जुळल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आरोपीचे बोटांचे ठसे जुळले नाहीत
खरं तर, सीआयडीने सिस्टम-जनरेटेड रिपोर्टद्वारे याची पुष्टी केली आणि म्हटले की गुन्ह्याच्या ठिकाणाहून गोळा केलेले १९ बोटांचे ठसे आणि आरोपींच्या बोटांचे ठसे जुळत नव्हते. आता हा अहवाल पुणे सीआयडी अधीक्षकांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान, तपासादरम्यान, आरोपी मोहम्मद शहजादचा एक नवीन कबुलीजबाब समोर आला आहे. यामध्ये त्याने सांगितले की, अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यातून चोरी करण्यात अयशस्वी झाल्यानंतर तो सैफच्या घरात घुसला.
आरोपीला पैसे का हवे होते?
आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याला आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, त्यासाठी त्याने चोरीची योजना आखली होती. ज्या व्यक्तीने त्याच्यासाठी कागदपत्रे तयार करण्याचे आश्वासन दिले होते त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुंबई पोलिसांचे पथक रविवारी चौकशीसाठी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे. सैफ अली खान प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर काही दिवस कोलकातामध्ये राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मुंबई पोलिसांनी पश्चिम रेल्वेची मदतही मागितली होती.
सैफने पोलिसांना दिला जबाब
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. सैफ अली खाननेही पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. त्या रात्री घडलेला प्रकार सैफ अली खानने पोलिसांना सांगितला आहे. हल्लेखोर जहांगीरच्या खोलीत घुसला होता. बाहेरचा गोंधळ ऐकून करीना आणि सैफ तिथे धावले आणि हल्लेखोर जहांगीरकडे जात असताना त्याच्यात आणि सैफमध्ये हाणामारी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.