Remo D'Souza: जीवे मारण्याची धमकी, इच्छापूर्तीचे धाडस; चेहरा झाकून रेमो डिसूझा पोहोचला महाकुंभ मेळ्यात!

Remo D'Souza reached Maha Kumbh 2025 : प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा शनिवारी महाकुंभ २०२५ साठी प्रयागराजला पोहोचला. त्याने पत्नी लिझेल आणि मुलांसह प्रयागराज संगममध्ये स्नान केले.
Remo D'Souza reached Maha Kumbh 2025
Remo D'Souza reached Maha Kumbh 2025Saam Tv
Published On

Remo D Souza reached Maha Kumbh : गंगा, यमुना नदीच्या संगमावर स्नान करण्यासाठी देश-विदेशातून भाविक महाकुंभात येत आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू सुरेश रैना, गुरु रंधावा आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक मोठ्या मंडळींनी महाकुंभात पवित्र स्नान केले, त्यानंतर आता रेमो डिसूझाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कारण तो महाकुंभ मेळ्यात जाऊन आलं आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा शनिवारी महाकुंभ २०२५ साठी प्रयागराजला गेला होता. त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला, व्हिडिओ शेअर करताना रेमोने कॅप्शनमध्ये हात जोडून आणि हृदयाचा इमोजी बनवला आहे. पत्नी लिझेल आणि मुलांसह प्रयागराज संगममध्ये डुबकी मारल्यानंतर, त्याने बोटीतून प्रवास केला आणि पक्ष्यांना जेवू घातले. रेमोने स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांनाही भेटले आणि त्यांचे प्रवचन ऐकले.

Remo D'Souza reached Maha Kumbh 2025
Sky Force Box Office collection Day 3: ३ दिवसांत ६१ कोटी...; 'स्काय फोर्स' ठरला अक्षय कुमारसाठी टर्निंग पॉईंट

रेमो काळ्या शालने चेहरा झाकलेला

रेमोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो काळ्या कपड्यांमध्ये संगम घाटावर ध्यान करताना दिसत आहे आणि त्याचा चेहरा काळ्या शालने झाकलेला आहे. घाटावर एका महिलेने त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला पण रेमो पुढे निघून गेला. त्या महिलेने रेमोला ओळखले आणि त्याच्याशी बोलू इच्छित होती पण रेमो महाकुंभात आपली ओळख लपवताना दिसला, माध्यमांशी बोलताना रेमो म्हणाला - 'भोलेनाथ आणि माझ्या चाहत्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत, मला कशाचीही भीती वाटत नाही. अलिकडेच मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबद्दलच्या प्रश्नांवर त्याने उत्तर दिले.

Remo D'Souza reached Maha Kumbh 2025
Republic Day 2025: 'राजा हरिश्चंद्र' ते 'पुष्पा २'; ७५ वर्षात भारतीय चित्रपटसृष्टीत झाले 'हे' मोठे बदल!

अनेक मोठे स्टार पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभात पोहोचत आहेत, दरम्यान, रेमोने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो ध्यान करताना आणि आध्यात्मिक अनुभव घेताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रेमो काळे कपडे घालून, खांद्यावर बॅग घेऊन आणि काळ्या शालने चेहरा लपवून महाकुंभ परिसरात फिरताना स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com