
Republic Day 2025: भारतीय चित्रपटसृष्टीने १९४० च्या दशकात आपला मजबूत पाया रोवला असला तरी, त्या पायावरची उंच इमारत १९५० मध्ये बांधण्यास सुरुवात झाली जेव्हा भारतात प्रजासत्ताक स्थापन झाले. आज, ७५ वर्षांनंतर, आज भारतीय चित्रपट एक भव्य इंडस्ट्री बनली आहे. जेव्हा भारतीय चित्रपटाची सुरुवात झाली होती, तेव्हा हॉलिवूड चित्रपट जगात खूप लोकप्रिय होते. आजपर्यंत आपण सिनेमाच्या अनेक पायऱ्या चढलो आहोत आणि एका नवीन शिखरावर पोहोचलो आहोत. आज जगातील १०० हून अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपटांना पसंती दिली जात आहे.
जर आपण इतिहास पहिला तर, मे १९१३ मध्ये जेव्हा दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा मूकपट बनवून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला, तेव्हा देशाला या कामगिरीचा अभिमान होता. पण त्यावेळी सिनेमा अनेक प्रश्नांनी वेढलेला होता. शिवाय, त्या काळात केवळ चित्रपटांमध्ये काम करणेच नव्हे तर चित्रपट पाहणे देखील वाईट मानले जात असे. १९३१ मध्ये 'आलम आरा' चित्रपटाने जेव्हा टॉकीजचा युग सुरू झाला तेव्हाही समाजाचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता, परंतु भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतर सिनेमाने असे वळण घेतले की सिनेमा 'स्टेटस सिम्बॉल' बनला. तथापि, १९४० च्या दशकात आपल्या चित्रपटांनी मोठी प्रगती करण्यास सुरुवात केली. १९४६ मध्ये, चेतन आनंद यांच्या 'नीचा नगर' या पहिल्या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'पाल्मे डीओर' पुरस्कार मिळाला आणि पहिल्यांदाच जगात भारतीय चित्रपटांचा झेंडा उंचावला. या दशकात बंधन, चित्रलेखा, किस्मत, राम राज्य, शकुंतला, शहीद, अंदाज, महल आणि बरसात यासारख्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांची सिनेमाकडे ओढ वाढली होती.
प्रजासत्ता स्थापनेनंतर, १९५० मध्ये 'समाधी', 'जोगवान', 'हर हर महादेव', 'सरगम' आणि 'आरजू' हे सर्वात यशस्वी चित्रपट होते. अशोक कुमार, नलिनी जयवंत, सुरैया, कामिनी कौशल आणि नर्गिस हे तेव्हाचे प्रसिद्ध कलाकार होते. यासोबतच राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद हे त्रिमूर्तीही उदयास आली. दुसरीकडे, १९५० च्या सिनेमॅटोग्राफी कायद्याअंतर्गत जानेवारी १९५१ मध्ये सेन्सॉर बोर्डाची स्थापना झाली, तर १९५२ मध्ये देशात चित्रपट संस्कृतीची देवाणघेवाण करणे आणि भारतीय चित्रपट जगभरात उपलब्ध करून देणे या उद्देशाने 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' देखील सुरू करण्यात आला. १९५४ मध्ये पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला. दरम्यान, यावर्षी फिल्मफेअर पुरस्कार देखील सुरू झाले.
राज कपूर, सत्यजित रे, लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन
१९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ सुरु झाला. १९५१ मध्ये राज कपूर यांच्या 'आवारा' चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली की भारतीय चित्रपट देशाच्या सीमा ओलांडून रशियासह जगात लोकप्रिय होऊ लागला. राज कपूर आणि सत्यजित रे या दोघांनीही भारतीय चित्रपटसृष्टीला जगात एक वेगळी ओळख आणि आदर मिळवून देण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. १९५५ मध्ये सत्यजित रे यांनी 'पथेर पांचाली' या त्यांच्या पहिल्या बंगाली चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांकडे जगाचे लक्ष वेधले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने अतुलनीय योगदान देऊन चित्रपट संगीत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित करण्यात विशेष भूमिका बजावली. दुसरीकडे, या काळात फक्त एकच सुपरस्टार झाले ते म्हणजे अमिताभ बच्चन. १९५१ ते १९६० या दहा वर्षांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पाच उत्कृष्ट चित्रपटांपैकी 'आवारा', 'मदर इंडिया' आणि 'मुघल-ए-आझम' हे तीन चित्रपट या दशकात प्रदर्शित झाले.
त्यानंतर भारतीय चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही सतत प्रगती गेली. आता आपण तंत्रज्ञानाच्या अशा युगात पोहोचलो आहोत जिथे एआय तंत्रज्ञानाने काहीही शक्य आहे. याआधी, स्पेशल इफेक्ट्स, ४ साउंड ट्रॅक, ३डी, डॉल्बी, व्हीएफएक्स, आय मॅक्स आणि ४के सारख्या अनेक तंत्रज्ञानाने सिनेमाची जुनी प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. आता चित्रपट कमाईच्या बाबतीतही नवे विक्रम होत आहेत. पूर्वी चित्रपटाचे यश त्याच्या रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी आणि हीरक महोत्सवी वर्षांनी मोजले जात असे, परंतु २००८ मध्ये 'गजनी' नंतर, चित्रपटाचे यश त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवरून मोजले जाऊ लागले. पूर्वी हे यश १०० ते ५०० कोटी रुपयांनी मोजले जात होते, पण आता जेव्हा 'पुष्पा-२' सारख्या चित्रपटांनी २ हजार कोटींपर्यंत कमाई करायला सुरुवात केली आहे, तेव्हा यशाची सर्व जुनी समीकरणे मागे पडली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.