Sky Force Box Office collection Day 3: कमबॅक असावा तर ते अक्षय कुमारसारखा. सलग ९ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर, खिलाडी अक्षय कुमार हिट चित्रपटाच्या शोधात होता. पण आता असे म्हणता येईल की २०२५ वर्षाची सुरुवात त्याच्यासाठी जबरदस्त राहिली आहे. त्याचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. रविवारी अक्षय कुमारच्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.
स्काय फोर्सची ३ दिवसांत कमाई?
अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटाने चाहत्यांना इम्प्रेस केले आहे. चित्रपटाची कथा खूप चांगली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २७.५० कोटी रुपये कमावले. जे तीन दिवसांत आतापर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १२.२५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी २२ कोटी रुपये कमावले होते. यासह, स्काय फोर्सने तीन दिवसांत भारतातून एकूण ६१.७५ कोटी रुपये कमावले आहेत.
अक्षय कुमारचा स्काय फोर्स टॉपवर
यासोबतच तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांची यादीही समोर आली आहे. स्काय फोर्स २७.५ कोटी रुपयांसह ३४ व्या स्थानावर आहे. त्याच्या चित्रपटाने अजय देवगणच्या 'दृश्यम २' ला मागे टाकले आहे. त्याच यादीत असलेला सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट देखील खूप मागे आहे. या चित्रपटाने फक्त २६.६१ कोटी रुपये कमावले. प्रभासच्या 'कलकी २८९८ एडी'ने तिसऱ्या दिवशी फक्त २६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. एमएस धोनीचा बायोपिक आणि शाहरुख खानचा 'डंकी 'ही मागे आहे.
बॉबी देओलचा डाकू महाराज
अक्षय कुमारच्या चित्रपटासोबतच बॉबी देओल आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'डाकू महाराज' या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही प्रदर्शित झाले. पण लॉर्ड बॉबी अक्कीसमोर अपयशी ठरला आहे. रविवारी या चित्रपटाने भारतातून एकूण १.६५ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला हिंदीमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. तर हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसाचे कलेक्शन ०.०५ कोटी होते. दुसऱ्या दिवशीही परिस्थिती अशीच होती. या चित्रपटाने भारतातून एकूण ८६.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.