
Vijay Thalapathy: तमिळ सुपरस्टार थलापती विजय यांच्याबद्दल बऱ्याच काळापासून असे वृत्त येत आहे की, येत्या काळात ते आपला पूर्ण वेळ राजकारणात घालवेल आणि अभिनय क्षेत्राला निरोप देईल. अभिनेत्याचे चाहते त्याच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत ज्याचे शीर्षक अद्याप जाहीर न झाल्यामुळे हा चित्रपट 'थलापथी ६९' म्हणून ओळखला जात होता. पण आज प्रजासत्ताक दिनानिमीत्ताने एच. विनोथ दिग्दर्शित या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करण्यात आली असून 'जन नायगन' असे थलापती विजयच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.
'जन नायागन'च्या पोस्टरमध्ये विजयचा स्वॅग
एवढेच नाही तर त्याने चित्रपटाचा पहिला लूक रिलीज करून चाहत्यांचा खुश केले आहे. चित्रपटाचे निर्माते केव्हीएन प्रॉडक्शन्सने विजयचा एक पोस्टर शेअर केला आहे, तसेच चित्रपटाचे नाव 'जन नायगन' असल्याचेही जाहीर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आम्ही त्याला #जाना नायकन म्हणतो.' पहिल्या लूक पोस्टरमध्ये विजय सेल्फी घेताना दिसत आहे, तर त्याचे हजारो फॉलोअर्स बॅकग्राउंडमध्ये त्याचा जयजयकार करताना दिसत आहेत.
विजय चित्रपटांमधून निवृत्त होणार आहे.
राजकारणात पूर्णपणे प्रवेश करण्यापूर्वी थलापती विजयचा जन नायगन हा शेवटचा सिनेमॅटिक चित्रपट करणार आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी तमिलागा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून विजय राजकीय कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. त्याच वर्षी त्यांनी त्यांच्या राजकारणातील कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांमधून निवृत्तीची घोषणा केली. काही वृत्तांनुसार, त्याचा पक्ष २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका लढवण्याची योजना आखत आहे.
शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटप्रेमी उत्सुक आहेत
थलापथीच्या शेवटच्या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार आहे. तर बॉबी देओल खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये ममिता बैजू, प्रकाश राज, गौतम वासुदेव मेनन आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध यांनी दिले आहे, त्याचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे आणि निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शनने केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबरमध्ये किंवा पुढच्या वर्षी पोंगल सणादरम्यान प्रदर्शित होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.