Krushna Abhishek Journey: गोविंदाचे कपडे घालण्यापासून ते कपडे ठेवण्यासाठी वेगळा फ्लॅट घेण्यापर्यंत; कृष्णा अभिषेकाचा अविश्वसनिय प्रवास!

Krushna Abhishek House: कृष्णा अभिषेकने त्याचे कपडे आणि बूट ठेवण्यासाठी ३ बीएचके घर खरेदी केले आहे. कृष्णाने स्वतः याबद्दल खुलासा सांगितले.
Krushna Abhishek House
Krushna Abhishek HouseInstagram
Published On

Krushna Abhishek House: अभिनेता विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकने अलीकडेच खुलासा केला आहे की त्याने त्याचे कपडे आणि बूट ठेवण्यासाठी एक वेगळा तीन बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. या अभिनेत्याचे डिझायनर शूज आणि कपड्यांवरील प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. म्हणूनच त्याने फक्त कपडे आणि बूट ठेवण्यासाठी फ्लॅट घेतला. एवढेच नाही तर कृष्णा दर ६ महिन्यांनी त्याचे शूज आणि कपड्यांचे कलेक्शन बदलत असते.

गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक नुकताच अर्चना पूरण सिंगच्या यूट्यूब चॅनलसाठी एका मुलाखतीला उपस्थित राहिला. अर्चनाने कृष्णाला जेवणासाठी आमंत्रित केले होते. या संभाषणादरम्यान, कृष्णाने बूट आणि कपड्यांवरील प्रेम व्यक्त केले. त्याच्याकडे इतके कलेक्शन आहेत की ते ठेवण्यासाठी त्याने वेगळं घर खरेदी केली आहे आणि त्याचे बुटीकमध्ये रूपांतर केले.

Krushna Abhishek House
Highest Paid OTT Actors In India: अजय देवगण, जयदीप अहलावत की करीना कपूर; ओटीटीविश्वात सर्वाधिक फी कोणाची?

कृष्णाचा प्रेम पाहून अर्चनाचा पती परमीत सेठी पूर्णपणे हादरला. मग कृष्णाने सांगितले की तो ६ महिन्यांत बरेच कपडे आणि बूट बदलतो. यावर अर्चना गमतीने म्हणते की तिचा मुलगा आयुष्मानही तुझ्या उंचीचा आहे, टाकून देण्याच्या वेळी जे नको असेल ते आयुष्मानला दे.

Krushna Abhishek House
Mrunal Thakur: स्वतःला संपवण्याचा मराठमोळ्या मृणाल ठाकूरचा विचार! कारण काय?

गोविंदाचे कपडे घालायचा

कृष्णाने त्याच संभाषणात सांगितले की, तो लहानपणी त्याचे मामा गोविंदाचे कपडे घालायचा. या काळात, त्याला एकदा वाटले की डीएनजी फॅशन ब्रँडचे नाव खरोखर डेव्हिड (धवन) आणि गोविंदाच्या नावावर आहे. कृष्णा म्हणाला, 'मला वाटलं होतं की ते दोघेही प्रसिद्ध असतील आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला असले. माझ्या कॉलेजच्या काळात मी सर्व मोठ्या ब्रँडचे कपडे घालायचो. त्यावेळी मला त्या ब्रँडबद्दल काहीच माहिती नव्हती. मी हल्लीच्या काळात मोठ्या ब्रँड्सची नावे बरोबर उच्चारायला शिकलो आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com