
मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी हाती आली आहे. महाविकास आघाडीला अजित पवार यांनी जोरदार दणका दिलाय. मुंबादेवी येथील शरद पवार आणि ठाकरे गटाच्या २०० पदाधिकाऱ्यांनी देवगिरी येथे अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेदेखील उपस्थितीत होते. शिवसेना ठाकरे गट समन्वय फैजुल्ला खान यांच्या नेतृत्वात शेकडो महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला.
इतक्या मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी पक्षाला राम-राम ठोकल्यामुळे काका शरद पवार यांची चिंता वाढवलीय. महापालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत. मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये महायुतीला अस्मान दाखवण्याचा चंग बांधणाऱ्या शरद पवार आणि ठाकरे गटाला मात्र एकाबाजुला गळकी लागलीय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाकरे गटातून जोरदार आऊटगोइंग सुरू झालीय.
आज वर्सोवा येथील कट्टर ठाकरे समर्थक असलेल्या राजुल पटेल ह्यांनी आपला पत्ता बदलला. ठाकरे गटाबरोबर शरद पवार गटाला देखील गळकी लागलीय. आज मु्ंबईतील मुंबादेवी येथील काही २०० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शरद पवार गटाच्या २०० पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडलाय. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केलाय.
यामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुती महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के देताना दिसत आहे. दोन दिवसांपासून शिंदे गटाने ठाकरे गटाच्या नेत्यांना आपल्या पक्षात पक्ष प्रवेश करून घेत ठाकरेंची चिंता वाढवली होती. त्यातच महायुतीतील मित्रपक्ष अजित पवार यांनीही आज ठाकरे गट आणि शरद पवार गटाला जोरदार धक्का दिलाय. मुंबईमधील मुंबादेवी येथील शरद पवार आणि ठाकरे गटाचे २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला.
या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यानं राजुल पटेल ह्या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी शिवबंधन तोडत हाती धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. पक्षात मेहनत केल्यानंतर आपल्याला काही फायदा झाला नसल्याची खद-खद व्यक्त करत त्यांनी पक्षप्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.