Axar Patel: रोहित शर्माने खुलासा करताच अक्षर पटेलने बाळाचा फोटो केला शेअर; नावही सांगितलं

Axar Patel New Born Baby: भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) दरम्यान त्याचा गोलंदाज अक्षर पटेलबद्दल मोठा खुलासा केला आहे.
Axar Patel New Born Baby
Axar Patel New Born Babysaam tv
Published On

नुकतंच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बाबा झाला. त्यानंतर आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू बाप झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) दरम्यान त्याचा गोलंदाज अक्षर पटेलबद्दल मोठा खुलासा केला आहे. बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान रोहितने मीडियाला अक्षरच्या मुलाबद्दल सांगितले.

Axar Patel New Born Baby
IND vs PAK : भारत-पाकिस्तान भिडणार, हायव्होल्टेज सामन्याची तारीख अन् ठिकाण ठरलं!

मेलबर्नमध्ये पत्रकारांनी रोहितला अक्षर पटेलपेक्षा तनुष कोटियनची निवड करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी रोहितने सांगितलं की, अक्षर काही दिवसांपूर्वी बाबा झाला आहे. त्यामुळे तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत आहे. रोहितच्या या माहितीनंतर अक्षरने चाहत्यांना नवजात मुलाची पहिली झलक दाखवली आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलने आपल्या मुलाचे नावही चाहत्यांना सांगितलंय.

Axar Patel New Born Baby
Vinod Kambli: मेंदूत रक्ताच्या गुठळ्या आणि इन्फेक्शन; विनोद कांबळीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी 'या' व्यक्तीने घेतला पुढाकार

अक्षर पटेलने मंगळवारी आपल्या नवजात मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अक्षरने सांगितलं की, त्यांनी मुलाचे नाव Haksh पटेल ठेवलं आहे. या फोटोमध्ये अक्षरने आपल्या मुलाला टीम इंडियाची जर्सी घातली आहे. ज्यावर 'चीअरिंग फॉर इंडिया' असं लिहिलेलं दिसतंय.

Axar Patel New Born Baby
Cricket News: भारतीय खेळाडूच्या वडिलांना ७ वर्षांचा तुरुंगवास, १४ लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

अक्षरने मुलाचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये बाळाचा हात दोघांनी धरलेला दिसतोय. हक्षचा जन्म १९ डिसेंबरला झाला. अक्षरने या पोस्टमध्ये लिहिले आहे- "तो अजूनही लेग ऑफ साइड शोधतोय. परंतु आम्ही तुम्हा सर्वांना त्याची ओळख करून देण्यासाठी थांबू शकत नाही. हक्ष पटेल याचं स्वागत आहे.

कधी झालं होतं अक्षरचं लग्न

हक्ष अक्षर आणि त्याची पत्नी मेहा यांचं पहिलं बाळ आहे. या जोडप्याने जानेवारी 2023 मध्ये लग्न केलं होतं. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होतं की, शेवटच्या दोन टेस्ट सामन्यांसाठी अक्षरची निवड करण्यात आली नाही कारण त्याच्या कुटुंबात नुकतंच एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. रविचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीनंतर मुंबईचा ऑफस्पिनर तनुष कोटियनला दोन टेस्ट सामन्यांसाठी भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आलंय.

Axar Patel New Born Baby
Boxing Day Test: बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय? काय सांगतो इतिहास?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com