Vinod Kambli: मेंदूत रक्ताच्या गुठळ्या आणि इन्फेक्शन; विनोद कांबळीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी 'या' व्यक्तीने घेतला पुढाकार

Vinod Kambli Treatment : ठाणे जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्या आवश्यक चाचण्या केल्यानंतर एक नवीन आजार समोर आलाय. यावेळी एका अज्ञात व्यक्तीनेही कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केलाय.
Vinod Kambli Treatment
Vinod Kambli Treatmentsaam tv
Published On

टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळीची सोमवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात भरती करावं लागलं. विनोद कांबळी सध्या ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. कांबळी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजतोय. हृदयविकारा सोबतच ते इतरही अनेक समस्यांच्या तक्रारी आहेत. अशातच कांबळीच्या उपचारांचा खर्च एक अज्ञात व्यक्तीने उचलला असल्याची माहिती आहे.

कांबळीने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, त्याला युरिन इन्फेक्शनचाही गंभीर त्रास आहे. दरम्यान त्याला अजून एक समस्या असल्याचं समोर आलं आहे. वास्तविक, ठाणे जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्या आवश्यक चाचण्या केल्यानंतर एक नवीन आजार समोर आलाय. यावेळी एका अज्ञात व्यक्तीनेही कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केलाय.

कांबळीच्या मदतीसाठी कोणी घेतला पुढाकार?

आकृती हॉस्पिटलचे डॉ.विवेक त्रिवेदी यांनी विनोद कांबळीबाबत मोठी माहिती दिलीये. डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं की, कांबळीच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे. डॉक्टरांची एक टीम मंगळवारी त्याच्या अजून काही वैद्यकीय तपासण्या करणार आहे.

Vinod Kambli Treatment
IND vs PAK : भारत-पाकिस्तान भिडणार, हायव्होल्टेज सामन्याची तारीख अन् ठिकाण ठरलं!

याशिवाय डॉक्टरांनी सांगितलं की, आकृती हॉस्पिटलचे प्रभारी एस सिंग यांनी कांबळीच्या वैद्यकीय सुविधेत आयुष्यभर मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ कांबळीला यापुढे उपचारासाठी पैशांच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही.

कांबळीची प्रकृती पाहून टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी त्याच्या 1983 च्या वर्ल्डकपमधील सहकाऱ्यांसह त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी 52 वर्षीय विनोद कांबळी यांनीही कपिल देव यांची ऑफर स्वीकारली होती. याशिवाय या दिग्गजांनी दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Vinod Kambli Treatment
IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीत KL Rahul रचणार इतिहास! स्पेशल हॅट्रिक करण्याची संधी

कांबळीच्या डोक्यात क्लॉट्स

डॉ. विवेक त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीला सुरुवातीला युरिन इन्फेक्शन आणि क्रॅम्प्स आल्याची तक्रार जाणवत होती. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या काही टेस्ट केल्यानंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं निष्पन्न झालंय.

Vinod Kambli Treatment
Vinod Kambli : विनोद कांबळीची अचानक तब्येत बिघडली; ठाण्यातील रुग्णालयात केलं दाखल

डॉ. त्रिवेदी म्हणाले की, आकृती हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेतली जात असून वैद्यकीय पथकाला अनेक चाचण्यांनंतर त्याच्या मेंदूमध्ये गुठळी आढळून आली.

Vinod Kambli Treatment
Team India मध्ये 'या' खेळाडूनं घेतली आर.अश्विनची जागा; अ गटाच्या सामन्यांमध्ये केलाय कहर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com