Team India मध्ये 'या' खेळाडूनं घेतली आर.अश्विनची जागा; अ गटाच्या सामन्यांमध्ये केलाय कहर

Tanush Kotian In Team India: आर. अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर आता त्यांच्या जागी एका तरुण भारतीय खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळालीय.
R Ashwin And Virat Kohali
Tanush Kotian In Team Indiatwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना मोठा बसला. भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतली. अश्विनच्या जागी आता एका नव्या खेळाडूला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळालीय. अश्विनच्या जागी मुंबईतील तरुण खेळाडू तनुष कोटियानला भारतीय क्रिकेट संघात घेण्यात आले आहे.

R Ashwin And Virat Kohali
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा बॉक्सिंग डे टेस्टसाठी मोठा डाव, टीम इंडियाचे खेळाडू नाराज; नेमकं कारण काय?

तनुष हा ऑलराउंडर असून कोटियान हा बॉक्सिंग डे क्रिकेटपूर्वी टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. कोटियान हा मंगळवारी ऑस्ट्रेलियासाठी निघेल. कोटियानचं नाव एक उत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून घेतंल जातं. त्याने आपल्या धमाकेदार कामगिरने अनेकांना प्रभावित केलंय. कोटियान विजय हजारे ट्रॉफीत मुंबईच्या संघाकडून खेळत आहे. तो अहमदाबादमध्ये असून मुंबईत आल्यानंतर कोटियान उद्या ऑस्ट्रेलियासाठी निघणार आहे.

R Ashwin And Virat Kohali
IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीत KL Rahul रचणार इतिहास! स्पेशल हॅट्रिक करण्याची संधी

कोटियानने इंडियाच्या अ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अ विरुद्धात दमदार खेळ केला होता. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्येच होते, त्यामुळे त्याला व्हीसाची समस्या येणार नाही. कोटियान यांनी आतापर्यंत ३३ प्रथम श्रेणीच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी केली. यात त्याने चांगलं प्रदर्शन केलंय. त्याने या सामन्यात ४१.२१ च्या सरासरीने १०१ विकेट घेतल्या.

तसेच १५२५ धावा आपल्या नावावर केल्या. प्रथम श्रेणीच्या सामन्यात या खेळाडूने २ शतकदेखील त्याने केले आहेत. या यादीत अ दर्जाच्या २० सामन्यात २० विकेट आणि ९० धावा केल्या. तर ३३ टी-२० सामन्यात त्याने ३३ विकेट घेतल्या शिवाय ८७ धावाही त्याने केल्यात. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान ५ सामन्याच्या कसोटी सामन्यात ४ सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे.

या सामन्याआधी कोटियान भारतीय संघात सामील होईल. अखेरच्या पाच सामन्यात कोटियानने ३ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत, या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com