Ranbir Kapoor Net worth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Net worth : अबब! एका चित्रपटासाठी रणबीर कपूर किती घेतो मानधन? आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Shreya Maskar

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आहे. रणबीर कपूरने अनेक हिट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयाने त्यांने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. रणबीरचा मोठा चाहता वर्ग आहे. रणबीरने आपल्या दमदार स्टाइलने सर्वांना वेड लावले आहे. रणबीरचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या ॲनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. बॉलिवूडचा सावरिया अशी त्याची ओळख आहे.

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर चित्रपटातून वर्षाला 30 कोटी रुपये कमवतो. रणबीर कपूर 2014 पासून म्युझिक स्ट्रिमिंग कंपनीचा शेअरहोल्डर आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. रणबीर विविध क्षेत्रात लोकप्रिय असून तो फूड, शॉपिंग आणि टेक्नोलॉजी ब्रँडची जाहिराती करतो. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर जाहिरातीमधून 6 कोटी रुपये कमवतो.

रणबीरने त्याच्या दमदार चित्रपटांबरोबर क्रीडा क्षेत्रात ही आपले नाव कमावले आहे. रणबीर इंडियन सुपर लीगमध्ये मुंबई सिटी एफसी मालक आहे. यात त्याची 35 टाक्यांची भागीदारी आहे. रणबीरने 2022 मध्ये पुण्यात ड्रोन स्टार्टअप कंपनीचे शेअर विकत घेतले आहे. रणबीरचा इको फ्रेंडली होम प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीत देखील हिस्सा आहे. रणबीरची होम प्रोडक्ट कंपनी कंपोस्टेबल कचरा पिशव्या, किचन टॉवेल रोल्स यांसारखी विविध उत्पादने तयार करते. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीरने 20 लाखपर्यंत रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहे.

रणबीर कपूरचे वांद्रे येथे 4 BHK अपार्टमेंट आहे. याशिवाय रणबीरकडे पुण्यात ट्रम्प टॉवरमध्ये 13 कोटी रुपयांचे अलिशान अपार्टमेंट आहे. रणबीरने ही प्रॉपर्टी भाड्याने दिली असून त्याला 48 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न येतं. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर एकूण 345 कोटींचा मालक ( Net worth) आहे. तर आलिया भट्ट तब्बल 550 कोटींची मालकीण आहे. रणबीरपेक्षा आलियाची संपत्ती जास्त आहे. आलियाने आपल्या अभिनयाने आणि लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे. आलिया एका चित्रपटातून सुमारे 10-12 कोटी रुपये कमावते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Gaurd Allowance: राज्यातील होमगार्डच्या भत्यात मोठी वाढ, ४०,००० जणांना होणार लाभ

Sadabhau Khot: शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

PKL 2024: बंगाल वॉरियर्सचा कॅप्टन ठरला! मनिंदर सिंग नव्हे, तर या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Maharashtra News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Bhandara News : भंडाऱ्यात कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; पाच ते सहा महिला गंभीर जखमी, VIDEO

SCROLL FOR NEXT