Ranbir- Raha Video: नवे घर पाहण्यासाठी वडिलांसोबत पोहचली राहा, लवकरच रणबीर कपूर होणार शिफ्ट; व्हिडीओ व्हायरल

Ranbir- Raha Spotted: नुकतंच नवीन घराची पाहणी करण्यासाठी रणबीर मुलगी राहाला घेऊन गेला होता. यादरम्यानचा, रणबीर आणि राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Ranbir- Raha VideoSaam Tv
Published On

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भटची मुलगी राहा कपूर गोंडस अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. राहाला कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी पापाराझी कायम उत्सुक असतात. अशातच, वडिल रणबीर कपूरसोबतचा राहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Viral Video
Stree 2 box Office Collection Day 3: स्त्री 2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला, तिसऱ्या दिवशीही केली 'इतक्या' कोटींची कमाई

मागील अनेक महिन्यांपासून रणबीर आणि आलिया यांच्या नवीन घराचे काम सुरू आहे. आलिया आणि रणबीरने वांद्रा येथे घर घेतले आहे. अलिशान घराचं काम झाल्यानंतर संपूर्ण कपूर कुटुंब येथे एकत्र राहणार आहेत. स्वप्नातील या घरासाठी आलिया आणि रणबीरने २५० कोटी रूपये खर्च केला आहे. यादरम्यान, हे दोन्ही कपल सतत आपल्या नवीन घराच्या कामाची पाहणी करताना दिसतात. नुकतंच नवीन घराची पाहणी करण्यासाठी रणबीर मुलगी राहाला घेऊन गेला होता. यादरम्यानचा, रणबीर आणि राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेता रणबीर कपूर राहासोबत नवीन घराची पाहणी करण्यासाठी गेला होता. यावेळी कुल अंदाजात रणबीरने व्हाईट टिशर्ट आणि शॉर्ट्स परिधान केलीये. राहा देखील डेनिम लूकमध्ये क्यूट दिसतेय. व्हिडीओमध्ये, राहा रणबीरचा हात पकडून चालताना दिसत आहे. राहाचा गोड अंदाज कॅमेरात कैद करण्यात आला. सोशल मीडियावर सर्वत्र तिच्या क्यूटनेसवर प्रेम व्यक्त केले जात आहे. रणबीर आणि आलियाची मुलगी राहा आता दीड वर्षाची आहे. राहा कायम स्पॉट होत असते. अत्यंत गोंडस राहाचा चाहतावर्ग मोठा आहे. राहाचे फोटो, व्हिडीओ कायमच लक्ष वेधतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com