सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. सप्टेंबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये २ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसतोय. सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा २' आणि अभिनेते प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर २' या देन्ही चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. 'नवरा माझा नवसाचा २' आणि 'धर्मवीर २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरताना दिसत आहेत.
'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध गायक सोनु निगम याने गाणं गायलं आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त स्टारकास्टमुळे चित्रपट हिट ठरताना दिसत आहे. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटानंतर चाहत्यांना त्याच्या सिक्वलची उत्सुकता निर्माण झाली होती.
'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये १६.२८ कोटींचा गल्ला गाठला होता. या चित्रपटामध्ये महाराष्ट्रा भूषण आणि जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या जबरदस्त आणि दमदार कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यानंतर प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर २' हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील घटना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेते प्रसाद ओक यांनी धर्मवीर आनंद दिघे यांची मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेता क्षितीज दाते याने महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
'धर्मवीर २' या चित्रपटाने ३ दिवसांमध्ये ४.१० कोटींची कमाई केली आहे. 'नवरा माझा नवसाचा २' आणि 'धर्मवीर २' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. आता लवकरच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला याणार आहे. या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीसोबत अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट सुद्धा सुपरहिट ठरणार का? हे पाहाणं रंजक ठरणार आहे.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.