Shraddha Thik
कोरियन कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड, भारतीय ऑटोमोबाईलमधील सर्वात मोठ्या कार विक्री कंपन्यांपैकी एक आहे.
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
दीपिकाची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन ह्युंदाईने हे पाऊल उचलले आहे.
कंपनी मोठ्या पिकवर असताना म्हणजेच क्रेटा फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत असताना दीपिकाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
आता नवीन क्रेटाच्या प्रमोशनमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोणही असणार असल्याचे मानले जात आहे.
दीपिका याआधी Bisleri या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर झाली.
दीपिका अशा अनेक कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.