ऐतिहासिक निर्णय! या प्राचीन भारतीय क्रीडा प्रकाराचा Asian Games मध्ये समावेश

Yoga In Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतातील प्राचीन क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
ऐतिहासिक निर्णय! या प्राचीन भारतीय क्रीडा प्रकाराचा Asian Games मध्ये समावेश
indiayandex
Published On

Yoga Will Be A Demonstration Sport In Asian Games: आशियाई ऑलिम्पिक परिषदेची ४४ वी बैठक दिल्लीत पार पडली. या स्पर्धेत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये यापुढे योगासन या क्रीडा प्रकाराचा देखील समावेश करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर भारतीय खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या बैठकीला इतर देशातील अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती.

भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समितीचे प्रवक्ते सुरेंद्र हिंदुस्तानी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ' भारत सरकार आणि योगासन भारतने हा निर्णय येण्यासाठी अथक प्रयत्न केले. परिणामी योगासनाला खेळ म्हणून मान्यता मिळाली असून, या खेळाचा आशियाई स्पर्धेत समावेश केला जाणार आहे. या बैठकीत भारताचे राजा रणधीर सिंग यांची ओसीए अक्ष्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

ऐतिहासिक निर्णय! या प्राचीन भारतीय क्रीडा प्रकाराचा Asian Games मध्ये समावेश
IND vs BAN, Playing XI: टीम इंडियाची प्लेइंग 11 जवळपास पक्की... रोहित या 5 खेळाडूंना बसवणार

काय म्हणाले रणधीर सिंग?

रणधीर सिंग म्हणाले की, ' इतर खेळांमध्ये जखमी होण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र योगासन हा असा क्रीडा प्रकार आहे ज्यात जखमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. या खेळात मानसिक संतुलन वाढवण्यास मदत करतो. या क्रीडा प्रकाराचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करणं म्हणजे आशियातील प्राचीन संस्कृतीला वाव देण्यासारखं आहे. '

ऐतिहासिक निर्णय! या प्राचीन भारतीय क्रीडा प्रकाराचा Asian Games मध्ये समावेश
IND vs BAN: श्रेयस अय्यर अन् मोहम्मद शमीला संघात स्थान का नाही मिळालं? समोर आलं मोठं कारण

भारताच्या माजी धावपटू पीटी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी जून महिन्यातच, योगासन या क्रीडा प्रकाराचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे सर्व खेळाडूंनी, अधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या ऐतिहासिक निर्णयानंतर क्रीडा मंत्र्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, ' मला खूपच आनंद झाला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या योगासनाचा आता आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com