भारतीय संघ खऱ्या कसोटीसाठी तयार झाला आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे.
या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत रिषभ पंत कमबॅक करताना दिसणार आहे. तर यश दयाललाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही, काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्याला रणजी क्रिकेट खेळण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र तो आपल्या संघासोबत जोडला गेला नव्हता.
याच कारणास्तव बीसीसीआयने त्याचा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रेयस अय्यर आयपीएल खेळताना दिसून आला होता. त्याने गेल्या हंगामात कोलकाताला चॅम्पियन बनवलं. मात्र फलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.
श्रेयसला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता . या मलिकेतही त्याची बॅट शांतच राहिली. त्यानंतर दुलीप ट्रॉफीती पहिल्या सामन्यातही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे कमबॅक करु शकलेला नाही. त्याने प्रचंड मेहनत करुन फिटनेस पुन्हा मिळवली आहे. तो पूर्णपणे फिट आहे. मात्र त्याला दुलीप ट्रॉफीतही स्थान देण्यात आलेलं नाही. यासह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.